आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. शनिवारी (8 एप्रिल) मुंबईछ्या वानखडे स्टेडियमवर हे दोन संघ आमने सामने होते. या रोकांचक सामन्याच्या शेवटची सीएसकेने 7 विकेट्सने विजय मिळवला. सीएसके आणि भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा सामनावीर ठरला. जडेजाने शनिवारी एक असा झेल पकडला, ज्यामुळे मैदानी पंचांच्या जीवाला देखाल होता.
सीएसकेने (CSK) या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सला (MI) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईने मर्यादित 20 षटकांमध्ये 8 बाद 157 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात सीएसकेने हे लक्ष्य 18.1 षटकात 3 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. जडेजाने 4 षटकात 20 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सीएसकेसाठी हंगामातील हा सलग दुसरा विजय ठरला.
मुंबईच्या डावातील 9व्या षटकात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजीला आला होता. यावेळी स्ट्राईकवर ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन (Cameron Green) होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर ग्रीनने संपूर्ण ताकद लावत एक शॉट खेळला जो, थेट पंचांच्या दिशेने चालला होता. पण जडेजाने धाडस दाखवत हात मधे घातला आणि झेल पकडला. जडेजाला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानले जाते, जे त्याने हा झेल घेतल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध केले. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ग्रीनने 11 चेंडूत 12 धावा केल्या आणि जडेजाची शिकार बनला.
Sensational Ravindra Jadeja!
What a catch.pic.twitter.com/ogGiTPaRGA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 8, 2023
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दिग्गज अजिंक्य रहाणेला सीएसकेकडून वरच्या फळीत फलंदाजीची संधी मिळाली. रहाणेने या संधीचा पुरेपूर फायदा घेत 61 धावांची ताबडतोड खेळी केली. अवघ्या 19 चेंडूत त्याने आपले अर्धशतक साकारले, हे चालू आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक होते. दुसरीकडे मुंबईसाठी यावर्षीच्या हंगामाची सुरुवात देखील अपेक्षित पद्धतीने होऊ शकली नाही. हंगामातील सलग दुसऱ्या सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. (Ravindra Jadeja takes an amazing catch off Cameron Green)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी घ्यावी”, सलग दुसऱ्या पराभवानंतर रोहितचा संघसहकाऱ्यांना इशारा
वानखेडेवर ‘अजिंक्य’चा झंझावात! झळकावले आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक