श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour On India) असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) सुरू आहे. ही कसोटी मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग असून उभय संघ ही मालिका जिंकत त्यांची गुणतालिकेतील स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यजमान भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना तिसऱ्याच दिवशी १ डाव आणि २२२ धावांनी जिंकला आहे.
त्यामुळे मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाची नजर आगामी दुसऱ्या कसोटी सामन्यावर आहे. हा सामना १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र स्वरुपात (Day-Night Test) खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवसआधी (११ मार्च) भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Vice Captain Jasprit Bumrah) याने पत्रकार परिषदेत (Bumrah Press Conference) अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या उपलब्धतेबद्दल (Bumrah On Jadeja’s Presence) प्रतिक्रिया दिली आहे.
रविंद्र जडेजा पहिल्या कसोटी विजयाचा नायक
३३ वर्षीय जडेजाने दुखापतीनंतर भारताच्या कसोटी संघात जोरदार पुनरागमन केले आहे. त्याने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्याने या सामन्यात भारताकडून फलंदाजी करताना सर्वाधिक नाबाद १७५ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना दोन्ही डावात मिळून सर्वाधिक ९ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
जडेजाला विश्रांती दिली जाण्याची शक्यता
मात्र जडेजा नुकताच प्रदीर्घ दुखापतीतून बाहेर आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्याला आयपीएल २०२२ मध्ये खेळायचे आहे. तसेच भारतीय संघाचे पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रकही खूप व्यस्त आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन खेळाडूंच्या वर्कलोडचा विचार करत जडेजाला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता वर्तवली जात होती.
उपकर्णधार बुमराहने जडेजाच्या उपलब्धतेवर दिली प्रतिक्रिया
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधी भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार बुमराहने पत्रकार परिषदेत बरेच उलगडे केले. यादरम्यान त्याला जडेजाच्या विश्रांतीबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना बुमराह म्हणाला की, “मला वाटत नाही की, रविंद्र जडेजाने इतक्या शानदार प्रदर्शनानंतर विश्रांती करायला पाहिजे. तो सध्या त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करू इच्छेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
खोट बोला, पण रेटून बोला ! कुलदीप यादवला संघाबाहेर करण्यामागचे बुमराहने सांगितले हास्यास्पद कारण
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने विरोधी गोलंदाजाला मारली बॅट, कॅमेरात कैद झाली होती पूर्ण घटना