भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतीशी झुंज देत आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निवडले गेले नाही. त्याचवेळी सततच्या दुखापतीमुळे जडेजा लवकरच कसोटी क्रिकेटला रामराम करणार अशा बातम्या समोर येत आहेत. याच बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जडेजा याने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये तो खरंच निवृत्ती स्वीकारणार की नाही याबाबत संकेत दिले आहे. (Ravindra Jadeja Injury)
दुखापतीमुळे बाहेर जडेजा
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या कानपूर येथील पहिल्या कसोटीनंतर जडेजाला दुखापत झाली होती. स्कॅनिंगनंतर त्याला आगामी काळात चार महिन्यापेक्षा जास्त दिवस विश्रांती घ्यावी लागेल असे सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास कदाचित जडेजा आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये खेळताना दिसू शकणार नाही. तसेच जडेजा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपली कारकीर्द वाढवण्यासाठी कसोटी क्रिकेटला अलविदा करेल अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. आता स्वतः जडेजाने एक सूचक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. (Ravindra Jadeja Tweet)
जडेजाने केले असे ट्विट
कसोटीतून निवृत्तीच्या बातम्यांवर भाषण करताना जडेजाने एक ट्विट केले. त्याने स्वतः कसोटी जर्सी घातलेले एक छायाचित्र पोस्ट केले. त्याला कॅप्शन देत त्याने लिहिले,
‘आणखी खूप दूर जायचे आहे’
याचाच अर्थ सर्व जण असा लावत आहेत की, जडेजा इतक्यात कसोटीतून निवृत्ती स्वीकारणार नाही.
Long way to go💪🏻💪🏻 pic.twitter.com/tE9EdFI7oh
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) December 15, 2021
शानदार राहिली आहे कारकीर्द (Ravindra Jadeja Carrier)
जडेजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ५७ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि यामध्ये २१९५ धावांसह २३२ विकेट्स मिळवल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने १६७ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि २४११ धावा केल्या, तसेच १८८ विकेट्स देखील घेतल्या आहेत. टी२० आंतरराष्ट्रीयमधील क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीचा विचार केला तर, त्यामध्ये त्याने ५५ सामने खेळले आहेत आणि २५६ धावा केल्या आहेत आणि ४६ विकेट्स देखील स्वतःच्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/tamil-nadu-born-nivethan-radhakrishnan-to-play-for-australia-in-u19-world-cup-2021/
विराट-रोहित वादावर गावसकरांची समंजस प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दोघे…”