भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, या तिन्ही क्षेत्रात तो महत्वाची भूमिका बजावत असतो. तसेच इंग्लंड संघाविरुद्ध सध्या ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन ऐवजी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. ही कामगिरी पाहून माजी भारतीय फलंदाज भलतेच खुश झाले आहे.
सोनी टेन स्पोर्ट्स चॅनेलवर बोलताना माजी भारतीय विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने रवींद्र जडेजाचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याने म्हटले की,” आता रवींद्र जडेजा भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज आणि डाव्या हाताचा फिरकीपटू झाला आहे. यासह फलंदाजीमध्ये तो मोलाचे योगदान देत असतो. त्याला अजूनही त्याच्या क्षमतेची जाण झाली नाही, पण तरीही त्याची कामगिरी अभूतपूर्व आहे.”
वीरेंद्र सेहवाग पुढे बोलताना म्हणाला की, “मला अजूनही आठवत आहे की, जेव्हा रवींद्र जडेजा पहिल्यांदा संघात आला होता, त्यावेळी मी संघाचा उपकर्णधार होतो. आम्हाला त्यावेळी संघात अशा गोलंदाजाची गरज होती, जो फलंदाजीमध्ये देखील योगदान देऊ शकेल आणि आवश्यकता भासल्यास मुख्य गोलंदाजांना विश्रांती देऊ शकेल. याच गोष्टीचा विचार करून रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले होते.”(Ravindra Jadeja yet to realized his potential says virender sehwag)
जडेजाने २०१२ मध्ये केले होते कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण
रवींद्र जडेजाने २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.ज्यावेळी जडेजाला संघात स्थान देण्यात आले होते, त्यावेळी आर अश्विन,पियूष चावला आणि प्रज्ञान ओझा सारखे गोलंदाज संघात उपस्थित होते. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपल्या फिरकी गोलंदाजीने आणि तुफानी फटकेबाजीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.
रविंद्र जडेजाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
रवींद्र जडेजाने आतापर्यंत एकूण ५३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३५.८ च्या सरसरीने २०४१ धावा केल्या आहेत. तसेच त्याला २२१ गडी बाद करण्यात देखील यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारत सहजरित्या मालिका खिशात घालेल”, दिग्गज गोलंदाजाने टाकले टीम इंडियाच्या पारड्यात वजन