---Advertisement---

Video: टी२०मध्ये आपला ‘बनी’ बनलेल्या मॅक्सवेलला बाद करताच जडेजाचे ‘गन सेलिब्रेशन’ व्हायरल

On: बुधवार, एप्रिल 13, 2022 4:48 PM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

मुंबई। मंगळवारी (१२ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने २३ धावांनी विजय मिळवला. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा हा आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिलाच विजय ठरला. याच सामन्यात जडेजाने देखील गोलंदाजीत कमाल केली. यात त्याने ग्लेन मॅक्सवेलची देखील विकेट घेतली.

या सामन्यात चेन्नईने २१७ धावांचे आव्हान बेंगलोरसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरची सुरुवात खराब झाली. संघाने पॉवर प्लेच्या षटकांतच ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण, नंतर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ७ व्या षटकात जडेजा गोलंदाजीसाठी आला आणि त्याने आखुड टप्प्याचा चेंडू टाकत मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेल ११ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे जडेजाने टी२० क्रिकेटमध्ये मॅक्सवेलला ७ व्यांदा बाद केले आहे. त्यामुळे आता मॅक्सवेल जडेजाची (Ravindra Jadeja) नेहमीची विकेट ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जडेजाने खास सेलिब्रेशन
जडेजाने मॅक्सवेलला बाद करत या सामन्यातील आपल्या विकेट्सचे खाते उघडले होते. धोकादायक मॅक्सवेलला बाद केल्यानंतर त्याने खास स्टाईलमध्ये सेलिब्रेशनही केले. त्याने हवेन गन फायर करण्याची कृती करत मॅक्सवेलच्या विकेटचे सेलिब्रेशन (Jadeja’s Gun Celebration) केले. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा 

जडेजाची शानदार कामगिरी
बेंगलोरविरुद्ध जडेजाने गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. त्याने ४ षटकांत ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने मॅक्सवेलव्यतिरिक्त वनिंदू हसरंगा आणि आकाश दीप यांना बाद केले. याशिवाय त्याने दिनेश कार्तिकचा बाऊंड्री लाईनवर महत्त्वाचा झेलही घेतला. मात्र, फलंदाजीत त्याला खास काही करता आले नाही. तो शून्यावर बाद झाला.

चेन्नईचा विजय 
या सामन्यान रॉबिन उथप्पा (८८) आणि शिवम दुबे (९५) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या होत्या. तसेच २१७ धावांचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकांत ९ बाद १९३ धावाच करता आल्या. हा रविंद्र जडेजाचा चेन्नईचा कर्णधार म्हणून पहिलाच विजय ठरला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

बेंगलोरने सामना गमावला, पण विराटने जिंकली सर्वांची मने; संघर्ष करणाऱ्या ऋतुराजला केले प्रेरित

IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Video: ‘कॅप्टनकूल’च्या रणनीतीमध्ये फसला विराट; पुल शॉट मारायच्या नादात ‘अशी’ दिली विकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---