---Advertisement---

Video: आयपीएलपुर्वी मॅक्सवेलचा धुमाकूळ, नेट्समध्ये विचित्र ‘रिव्हर्स स्वीप’ शॉट मारत गोलंदाजांचे उडवले होश

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 8:56 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून आरसीबीच्या खेळाडूंसोबत सराव करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यासंर्दभात आरसीबीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आरसीबीच्या सर्व सदस्यांना भेटताना दिसत आहे. आपल्या सर्व संघ सहकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्याने फलंदाजीचा सराव केला, ज्यामध्ये त्याने बरेचशे आश्चर्यकारक शॉट्स खेळून यंदा चांगली खेळी करणार असल्याची आशा निर्माण केली आहे.

आरसीबीने ट्विटरद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मॅक्सवेलने फलंदाजीच्या सरावादरम्यान त्याच्या आवडत्या रिव्हर्स स्वीप शॉटची एक झलक दाखवली आहे.

या व्हिडिओमध्ये तो फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि इतर गोलंदाजांविरुद्ध रिव्हर्स स्वीप शॉट खेळताना दिसत आहे. यावर्षीच्या आयपीएल लिलावात त्याला आरसीबी संघाने 14 कोटी 25 लाखांच्या मोठ्या रकमेत खरेदी केले आहे. आयपीएल 2021 चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

मागील आयपीएल सत्रात मॅक्सवेलने काही खास कामगिरी केले नव्हती. त्यामुळे लिलाव होण्यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने त्याला मुक्त केले. परंतु या यावर्षीच्या लिलावात आरसीबीने कोटींमध्ये पैसा मोजत या धडाखेबाज खेळाडूला संघात सामील केले.

त्याची अलीकडीच्या काळातील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारताविरूद्धही मर्यादित स्वरूपाच्या क्रिकेट मालिकेत त्याने तुफानी खेळी खेळत आपल्याला खेळण्याचा सूर गवसल्याची माहिती दिली होती. यावर्षीच्या आयपीएल हंगामात जर त्याने त्याच्या फलंदाजीचा रंग दाखवला; तर विरोधी संघाच्या गोलंदाजांना कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.

आयपीएलमध्ये मॅक्सवेलने आत्तापर्यंत 82 सामने खेळले आहेत. यात त्याने 154.68 च्या स्ट्राइक रेटने 1505 धावा केल्या आहेत, ज्यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. मॅक्सवेल हा फलंदाज आहे जो काही मिनिटांत सामन्याचा पासा पलटवू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक फलंदाजाने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3 शतकही ठोकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीने ‘तो’ सल्ला दिला अन् माझं नशीब बदललं; टी नटराजनने सांगतली ‘राज की बात’

फलंदाजीत सुपरफ्लॉप ठरलेले एक असे क्रिकेटपटू, ज्यांच्या बायकोलाही नव्हता त्यांच्या खेळीवर विश्वास!

“एक दिवस तस्लीमा नसरीन मला प्रत्यक्षात भेटल्या तर…,” मोईन अलीच्या वडिलांची जबरदस्त फटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---