---Advertisement---

‘टी20, वनडे किंवा कसोटी, विराटचा दर्जाच वेगळा…’, कोहलीबद्दल दिग्गजाचे मन जिंकणारे वक्तव्य

Virat-Kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला बुधवारी (दि. 26 एप्रिल) घरच्या म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल 2023 स्पर्धेतील 36व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात कोलकाताने बेंगलोरचा 21 धावांनी पराभव केला. असे असले, तरीही सामन्याआधी आरसीबीचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी विराट कोहलीबद्दल वक्तव्य केले. यात त्यांनी विराटची जोरदार प्रशंसा केली.

संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी सांगितले की, विराट कोहली (Virat Kohli) जागतिक क्रिकेटवर किती प्रभाव टाकतो. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या अनुपस्थितीत विराट संघाचे शानदार नेतृत्व करत आहे. तसेच, संघाने आतापर्यंत शानदार खेळ दाखवला आहे.

काय म्हणाले बांगर?
सामना सुरू होण्यापूर्वी आरसीबीचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (RCB Batting Coach Sanjay Bangar) यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही या हंगामात आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आहे. काही सामन्यात आम्ही विजय मिळवला, तर काही सामन्यात पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत आलो आहोत. जर आमची हेच सातत्य राहिले, तर या स्पर्धेत नक्कीच चांगले प्रदर्शन करू शकतो.”

गोलंदाजीबद्दल बोलताना बांगर म्हणाले की, “हो, आम्ही मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांच्यावर खूपच अवलंबून आहोत. ते दोगे अनुभवी आहेत आणि संघासाठी खूपच उपयोगीही आहेत. दोघेही कठीण षठके टाकतात आणि खासकरून सिराज, जो मागील 12 महिन्यांपासून शानदार कामगिरी करत आहे. त्याचा आत्मविश्वास खूपच शानदार आहे. आमचे लक्ष हर्षल पटेलवर आहे. तो कठीण षटके टाकतो आणि या हंगामात जरा त्रस्त आहे.”

https://twitter.com/IPL/status/1651267885850046465

बांगर यांच्याकडून विराटचे कौतुक
विराट कोहली याच्याबद्दल बोलताना बांगर म्हणाले की, तो एक वेगळ्या दर्जाचा खेळाडू आहे. शब्दाद्वारे त्याच्या खेळाबद्दल सांगता येणार नाही. ते म्हणाले, “हे पाहा, विराट कोहली एक वेगळ्या दर्जाचा क्रिकेटपटू आहे. आपण त्याच्याबाबत काहीही म्हटले, तर ते त्याच्यासाठी पुरेसे नाही. तो नेहमी खेळाला उच्च स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मैदानावर त्याची चपळाई आणि संघासाठी आणलेली अनुभूती ही खूपच खास असते. तो नेहमी पुढे येऊन आपला खेळ आणखी चांगला करण्यासाठी तयार असतो. मग तो 20 षटकांचा खेळ असो किंवा 50 षटकांचा किंवा कसोटी क्रिकटे. त्याचे झटपट ही एकसारखीच असते. तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे.”

https://twitter.com/RCBTweets/status/1651267964673617920

या सामन्यात कोलकाताच्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली याने बेंगलोरसाठी मोठी खेळी साकारली. त्याने यावेळी 37 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 54 धावा चोपल्या. हे त्याचे आयपीएलमधील 49वे अर्धशतक ठरले. त्याच्याव्यतिरिक्त फक्त महिपाल लोमरोर याला 34 धावा करता आल्या. इतर एकही फलंदाज 30 धावांचा आकडा पार करू शकला नाही. त्यामुळे बेंगलोरला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 179 धावाच करता आल्या. अशात कोलकाताने हा सामना 21 धावांनी जिंकला.

https://twitter.com/IPL/status/1651290834170675200

खरं तर, आरसीबीचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या बरगड्यांमध्ये दुखापत आहे. त्यामुळे तो सध्या फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात फलंदाजीसाठी येत आहे. त्यामुळे विराट कोहली याने मागील काही सामन्यात संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ विजयदेखील मिळवत आहे. (rcb batting coach sanjay bangar said only words are not enough to describe virat kohli ability)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या पराभवानंतर आपल्याच खेळाडूंवर संतापला विराट, म्हणाला, “असं खेळला तर हरणारचं ना”
केकेआरने पुन्हा उडवला आरसीबीचा खुर्दा! घरच्या मैदानावर विराट सेनेचा पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---