---Advertisement---

आरसीबीचे कर्णधारपद हाती घेताच डू प्लेसिसने विरोधी संघासाठी वाजवली धोक्याची घंटी? व्हिडिओ पाहाच

On: रविवार, मार्च 20, 2022 12:43 AM
Faf-Du-Plessis
---Advertisement---

आयपीएल २०२२ लवकरच सुरू होणार आहे. फाफ डू प्लेसिस आयपीएलच्या १५ व्या हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला नुकतेच संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो स्पर्धेसाठी भारतात पोहोचला असून ३ दिवस क्वारंटाईनमध्ये घालवल्यानंतर त्याने नेटमध्ये सराव सुरू केला आहे. डू प्लेसिस नेटमध्ये मोठे शाॅट मारताना दिसला. त्याने ९ संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. डू प्लेसीच्या सरावाचा व्हिडिओ आरसीबीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फाफ डू प्लेसिसने त्याच्या फलंदाजीबद्दल खुलेपणाने सांगितले. डू प्लेसिस म्हणाला की, “पहिल्या दिवशी फार आक्रमक व्हायचे नव्हते. त्यामुळे थोडे स्ट्रेचिंग केले आणि धावलो. ३ दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर माझ्या गोष्टी एका लयीत परत आणायला सुरुवात केली. चेंडूवर बॅट जाणवण्यासाठी थ्रोडाऊन करून सुरुवात केली. त्यानंतर वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध काही चेंडू खेळलो.”

आरसीबीचा नवा कर्णधार डू प्लेसिसने यादरम्यान संघातील अनेक खेळाडूंशीही चर्चा केली. आयपीएल २०२२साठी ते कसा सराव करत आहेत, हे समजून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. या दिग्गज खेळाडूने संघाचे प्रशिक्षक संजय बांगर आणि आरसीबीचे संचालक माईक हेसन यांच्याशीही काही वेळ चर्चा केली. फाफ डू प्लेसिस गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला असून त्याने संघाला विजयी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. डू प्लेसिसने आयपीएल २०२१ मध्ये १६ सामन्यात ६३३ धावा केल्या होत्या.

आरसीबी संघ २७ मार्च रोजी पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएल २०२२चा पहिला सामना खेळणार आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. संघाचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३० मार्च रोजी याच मैदानावर होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने पुणे आणि मुंबईमध्ये खेळले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२मधून भारताच्या ‘या’ ३ स्टार गोलंदाजांचा पत्ता कट; शानदार गोलंदाजीने फलंदाजांना फोडायचे घाम

भारताच्या ‘या’ खेळाडूला आयपीएलमार्फत व्हायचंय वर्ल्डकप टीमचा भाग; वयाच्या ३६व्या वर्षीही मानत नाही हार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवासाठी मिताली राजने या गोष्टीला धरले जबाबदार; म्हणाली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---