---Advertisement---

वय फक्त आकडा! 38वर्षांच्या वयातही फाफचा जबरदस्त फिटनेस, हवेत झेप घेत पकडला अविश्वसनीय कॅच; Video

Faf-Du-Plessis-Catch
---Advertisement---

क्रिकेटमध्ये खेळाडूंकडे उर्जा, समर्पण आणि समंजस्यपणे कठीण परिस्थिती हाताळण्याची कला या गोष्टी असणे खूप गरजेचे असते. प्रत्येक खेळाडूंमध्ये या गोष्टी खूप कमी पाहायला मिळतात, पण ज्यांच्यामध्ये या गोष्टी आहेत, त्या खेळाडूंमध्ये 38 वर्षीय फाफ डू प्लेसिस या खेळाडूचा समावेश होतो. फाफ सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करत आहे. फाफच्या नेतृत्वात आरसीबीने त्यांचा पहिला सामना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध रविवारी (दि. 2 एप्रिल) एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला. या सामन्यात फाफमधील उर्जा दिसून आली. त्याने घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ फलंदाजीला उतरलेला. मुंबईच्या डावादरम्यान फाफ डू प्लेसिस याने हवेत झेप घेत असा काही झेल पकडला की, सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हा झेल इतका जबरदस्त होता की, पाहून प्रेक्षकही दंग झाले. आता या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

झाले असे की, फाफने हा झेल मुंबईच्या डावातील 18व्या षटकात पकडला. यावेळी आरसीबीकडून हर्षल पटेल गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईचा फलंदाज ऋतिक शोकीन याने मिड ऑफच्या दिशेने फटका मारला. मात्र, चेंडू हवेत उडाला आणि एकेवेळी असे वाटले की, चेंडू मिड ऑफच्या वरून निघून जाईल. मात्र, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या फाफने मागे धाव घेत हवेत डाईव्ह मारली आणि शानदार झेल पकडला. वयाच्या 38व्या वर्षीही फाफचा हा फिटनेस कौतुकास्पद आहे.

https://twitter.com/saravanaDjoko59/status/1642553076384141314

https://twitter.com/BataFaisal159/status/1642553050244980736

त्याचा झेल पाहून चाहतेही हैराण झाले. आता यादरम्यानचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हारल होत आहे. चाहते सोशल मीडियावर कर्णधाराच्या या क्षेत्ररक्षणाची जोरदार प्रशंसा करत आहेत.

सामन्याचा आढावा
मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावा केल्या होत्या. या धावांमध्ये तिलक वर्मा याच्या 84 धावांचे मोलाचे योगदान होते. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबी (RCB) संघाने 16.2 षटकातच 2 विकेट्स गमावत 172 धावा केल्या आणि सामना 8 विकेट्सने खिशात घातला. यावेळी आरसीबीसाठी विराट कोहली याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. विराटने यावेळी 49 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या, तर फाफ डू प्लेसिस याने 43 चेंडूत 73 धावांचे योगदान दिले.

आरसीबीचा पुढील सामना
आरसीबी संघाचा पुढील सामना गुरुवारी (दि. 6 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. या सामन्यातही कोलकाताला नमवत आरसीबी आपली विजयी घौडदौड सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल. (rcb captain faf du plessis brilliant superman style catch against mumbai indians IPL 2023 5th match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईसारख्या बलाढ्य संघाला धूळ चारताच वाढला फाफचा आत्मविश्वास; म्हणाला, ‘आमची खेळी पाहून…’
मुंबईविरुद्धच्या धमाकेदार मॅचविनिंग खेळीनंतर विराटचे मोठे भाष्य; म्हणाला, ‘तब्बल चार वर्षांनी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---