‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामात सुरूवात झाली आहे. शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे झालेला हा सामना अतिशय रोमांचक ठरला.
सुरुवातीला मुंबईकरांनी जोरदार फटकेबाजी करत बेंगलोरच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. दरम्यान क्रिस लीनच्या रुपात संघाला मोठी विकेट मिळाली. यावेळी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
तर झाले असे की, नाणेफेकीचा कौल बेंगलोर संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि क्रिस लिन सलामीला आले होते. डावातील चौथ्या षटकात धाव घेण्याच्या गोंधळात रोहित धावबाद झाला. परंतु लिनने एका बाजूने संघाचा डाव पुढे नेला.
अशात डावातील १३ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या लिनला वॉशिंग्टन सुंदरने आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात फसवले. सुंदरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लिनने आकर्षक चौकार खेचला. त्यापुढील दोन चेंडूवर प्रत्येकी एक धाव घेतल्यानंतर पाचव्या चेंडूवर लिनने सरळच्या दिशेने साधारण शॉट मारला. यावेळी गोलंदाज सुंदरने चेंडूच्या दिशेने धाव घेत अप्रतिम झेल टिपला.
https://twitter.com/JohnIyyappan/status/1380537862282600453?s=20
अशाप्रकारे ३५ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४९ धावांवर झेलबाद केले. ख्रिस लिनच्या रुपात बेंगलोरला अतिशय महत्त्वाची विकेट मिळाल्याने पाहून कर्णधार कोहलीच्या आनंदाला परिसीमा नव्हती. तू करुन दाखवलेस वॉशी असे म्हणत कोहलीने सुंदरच्या दिशेने धाव घेतली आणि त्याचे कौतुक केले.
https://twitter.com/IPL/status/1380539209132306432?s=20
कोहलीच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इंडियन प्रीमियर लीगने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सला दिलासा! चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीपुर्वी दिग्गज खेळाडूंनी सुरू केला सराव
ख्रिस लिनचे अर्धशतक एका धावेने हुकले, मुंबईच्या १३ षटकांनंतर ३ बाद १०५ धावा
रॉबिन उथप्पाला मिळाला ‘नॅशनल एक्सलन्स अवार्ड’, जाणून घ्या त्या पुरस्काराबद्दल






