अबु धाबी सोमवार रोजी (२१ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल २०२१ मधील ३१ वा सामना झाला. शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांपुढे बेंगलोरचे फलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांतच त्यांचा संघ ९२ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात कोलकाताच्या सलामीवीरांना १० षटकांतच संघाला सामना जिंकून दिला.
एकीकडे दणदणीत विजयानंतर कोलकाताच्या खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे; तर दुसरीकडे या मानहानिकारक पराभवाने बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीसह इतर खेळाडूही निराश आहेत.
या दारुण पराभवानंतर कोहलीने संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. एकवेळ सामन्यात चांगल्या स्थितीत असलेल्या बेंगलोरने पुढे केवळ २० षटकांतच ५ विकेट्स गमावल्या. यावर कोहली म्हणाला की, “आम्ही चांगली भागिदारी करणे महत्त्वाचे होते. आम्ही इतक्या लवकर इतक्या जास्त सरासरीची अपेक्षा केली नव्हती. एका विकेटसाठी ४२ धावा जोडल्यानंतर आम्ही २० धावांच्या जवळपास आमच्या ५ विकेट्स गमावल्या. हे आमच्यासाठी डोळे उघडण्याप्रमाणे आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच सामन्यात आमच्यावर अशी वेळ आल्यानंतर आता आम्हीला कोणत्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे, याची जाणीव झाली आहे.”
केकेआरविरुद्धच्या पराभवानंतरही आरसीबी संघाला याची जास्त चिंता नसल्याचे कर्णधार कोहलीने सांगितले आहे. “आम्ही आतापर्यंत ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आम्हाला पूर्वीपासूनच काही सामन्यात पराभूत होण्याचा अंदाज होता. हा खेळाचा एक भाग आहे. आम्हाला आमच्या ताकदीचा फायदा करुन घ्यावा लागणार आहे आणि आमच्या योजनांना अंमलात आणावे लागणार आहे,” असे त्याने पुढे म्हटले आहे.
केकेआरपुढे आरसीबी नतमस्तक
दरम्यान केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाचे प्रदर्शन अतिशय निराशादायी राहिले. प्रथम फलंदाजीस आलेल्या या संघाकडून सलामीवीर पडीक्कलने सर्वाधिक २२ केल्या. इतर फलंदाजांना साध्या २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. परिणामी आरसीबी संघ १९ षटकातच ९२ धावांवर सर्वबाद झाला.
त्यांच्या ९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरच्या सलामीवीरांनी ८२ धावांची भक्कम सलामी भागिदारी रचली. शुबमन गिलच्या आक्रमक ४८ धावा आणि वेंकटेश अय्यरच्या नाबाद ४१ धावांमुळे केकेआरने केवळ १० षटकात हा सामना खिशात घातला.
महत्वाच्या बातम्या-
दारुण पराभवानंतरही आरसीबीचे स्थान कायम, केकेआरला मात्र भरपूर फायदा; पाहा पाँईट टेबलची सद्यस्थिती
वेंकटेशचे ‘स्वप्नवत पदार्पण’, जेमीसनच्या भेदक चेंडूवर ८८ मीटरचा षटकार ठोकत लुटली मैफील
चक्रवर्तीच्या चक्रीवादळात अडकला मॅक्सवेल, चेंडूने गर्रकन फिरकी घेत क्षणात उडवल्या दांड्या