रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात बुधवारी (२६ मे) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ ६ विकेट्स गमावत १९३ धावाच करू शकला. परिणामी बेंगलोरने (आरसीबी) १४ धावांनी हा सामना जिंकला. या महत्त्वपूर्ण विजयानंतर आरसीबीच्या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता.
आरसीबीने मोडली मागील २ वर्षांची नकोशी परंपरा
आरसीबीच्या एलिमिनेटर (Eliminator Match) सामन्यातील मागील आकडेवारीला पाहता त्यांनी हा सामना जिंकणे कठीण दिसत होते. कारण आरसीबीने सातत्याने मागील २ हंगामात दमदार प्रदर्शन करत एलिमिनेटरपर्यंतचा प्रवात केला होता. परंतु दोन्हीही हंगामात एलिमिनेटर सामना गमावल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीविरुद्ध ४ विकेट्स राखून एलिमिनेटर सामना जिंकला होता. तर २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला ६ विकेट्सने चितपट केले होते.
अशात यंदाही आरसीबी (Royal Challengers Bangalore) या नकोशा कामगिरीची पुनरावृत्ती करत स्पर्धेतून बाहेर जाईल, असे आकडे सांगत होते. परंतु आरसीबीने या नकोशा आकड्यांना छेद देत क्वालिफायर २ साठी (Qualifier 2) पात्रता मिळवली आहे.
रजत पाटीदार राहिला विजयाचा शिल्पकार
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून रजत पाटीदारने (Rajat Patidar) नाबाद शतकी खेळी केली. ५४ चेंडू खेळताना ७ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावांची प्रशंसनीय खेळी त्याने केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर आरसीबीने लखनऊला २०८ धावांचे मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा बचाव करताना बेंगलोरकडून जोश हेजलवुडने ३ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलनेही महत्त्वाचे विसावे षटक टाकताना कमी धावा देत संघाचा विजय (RCB Beat LSG) निश्चित केला.
.@RCBTweets seal a spot in the #TATAIPL 2022 Qualifier 2! 👏 👏@faf1307 & Co. beat #LSG by 14 runs in the high-scoring Eliminator at the Eden Gardens, Kolkata. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/cOuFDWIUmk #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/mOqY5xggUT
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
या दिमाखदार विजयानंतर आरसीबीच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा (RCB Celebration) झाला होता. गोलंदाज हर्षल पटेल, शाहबाद अहमद, विराट कोहली, यष्टीरक्षक दिनेश कार्तिक, कर्णधार फाफ डू प्लेसिस या साऱ्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. मोहम्मद सिराजनेही आनंदाच्या भरात हर्षलला मिठी मारली. कर्णधार फाफने शतकवीर रजत पाटीदारला आलिंगन घालत त्याची पाठ थोपटली. आरसीबीच्या या विजयाच्या जल्लोषाचा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लेट पण थेट! हुड्डाची विकेट घेत हसरंगाचा नाद खुळा विक्रम; ताहिर अन् चहलसोबत खास यादीत सामील
दिग्गजांचा सहभाग असलेल्या महत्वाच्या यादीत रजत पाटीदार नव्याने सामील, पाहा काय आहे विक्रम
विकेट मिळूनही निराश का झाला राजस्थानचा ‘हा’ गोलंदाज? स्वत:च्याच डोक्यावर मारू लागला हात