---Advertisement---

RCB vs PBKS: जे MI-CSK ला जमलं नाही, ते RCB नं करून दाखवलं! पहिल्याच ओव्हरमध्ये विक्रमी कामगिरी

On: मंगळवार, जून 3, 2025 10:16 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025 Final) फायनल सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणजेच अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या ऐतिहासिक सामन्यात आरसीबी आणि पंजाब आमने-सामने आहेत. पंजाबचा कर्णधार श्रेयसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांनी त्यांच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल केला नाही. आरसीबीने पहिल्याच षटकामध्ये चेन्नईचा विक्रम मोडत इतिहास रचला आहे.

आरसीबीसाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि सॉल्ट(phil Salt) यांनी ओपनिंग करताना पहिल्या षटकात विक्रम रचला आहे. पंजाबकडून टाकलेल्या पहिल्या वेगवान षटकात पहिलाच चेंडू वाईड राहिला. यानंतर सॉल्टने दोन डॉट चेंडू खेळले, पण तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार झळकावला. चौथ्या चेंडूवर पुन्हा दोन धावा केल्या आणि पुन्हा पाचव्या चेंडूवर सॉल्टने चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे पोहोचवला. ओवरच्या शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव आली नाही, या प्रकारे आरसीबीने पहिल्या षटकात एकूण 13 धावा केल्या.

ही खेळी यासाठी खास राहिली, कारण आरसीबीने आयपीएल फायनलमध्ये पहिल्या षटकात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा रेकॉर्ड चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर होता. ज्यांनी 2023 आयपीएल फायनल सामन्यात गुजरात विरुद्ध पहिल्या षटकात 10 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीचा अनुभव आणि सॉल्टच्या आक्रमकतेने संघाला चांगली सुरुवात करून दिली, आता हे पाहणे गरजेचे असेल की आरसीबी ट्रॉफीवर त्यांचे नाव करू शकेल का?

IPL फायनल सामन्यात पहिल्या षटकात सर्वात जास्त धावा करणारे संघ
13/0 – आरसीबी विरुद्ध पंजाब, अहमदाबाद, 2025*
10/0 – चेन्नई बनाम गुजरात, अहमदाबाद, 2023
10/1 – कोलकाता बनाम पंजाब, बंगळुरू, 2014

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---