IPL 2025; आयपीएल 2025पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. 2025च्या हंगामापूर्वी संघांमध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, काही फ्रँचायझी त्यांच्या कर्णधाराला संघातून बाहेर काढण्यात आणि नवीन कर्णधाराच्या निवडीवरुन गोंधळात व्यस्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिलावापूर्वी आयपीएल 2025पूर्वी 4 संघ आपला कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहेत.
आयपीएलमध्ये सध्या 10 संघ आहेत. त्यामध्ये काही संघ त्याच्या कर्णधाराला कायम ठेवू शकतात. तर काही संघ त्यांचा कर्णधार बदलू शकतात. या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की, कोणते 4 चार संघ त्यांचे कर्णधार बदलू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: आयपीएल 2024मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. त्यावेळी फाफ डू प्लेसिस आरसीबी संघाची धुरा सांभाळत होता.मात्र, यावेळी आरसीबी आपला कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलचं (KL Rahul) नाव आघाडीवर आहे. शेवटच्या हंगामात राहुलनं लखनऊ सुपर जायंट्सच (LSG) नेतृत्व केलं होतं.
लखनऊ सुपर जायंट्स: लखनऊ सुपर जायंट्सनं (LSG) आयपीएल 2024मध्ये गुणतालिकेत 7वं स्थान मिळवलं होतं. त्यावेळी संघाचं नेतृत्व केएल राहुल करत होता. मात्र, एका सामन्यादरम्यान संघ व्यवस्थापन आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात वाद झाला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वादामुळे एलएसजी व्यवस्थापन केएल राहुलला (KL Rahul) कर्णधार पदावरुन काढून टाकू शकतं.
दिल्ली कॅपिटल्स: आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स (DC) सध्याचा कर्णधार रिषभ पंतला (Rishabh Pant) देखील संघातून सोडू शकते. असा एका अहवालात दावा करण्यात आला होता. शेवटच्या हंगामात दिल्लीनं पंतच्या नेतृत्वात 6 सामने जिंकले होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, दिल्ली कॅपिटल्स संघाची कमान पंतच्या जागी अक्षर पटेलकडे देण्याची तयारी करत आहे.
पंजाब किंग्ज: 2024च्या आयपीएल हंगामात देखील पंजाब किंग्जची खराब कामगिरी कायम राहिली. त्यांन 14 पैकी केवळ 5 सामने जिंकले होते. आणि 10 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर राहिले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, आयपीएल-2025च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्ज कर्णधार शिखर धवनलाही संघातून सोडू शकते.
आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणारच आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि आयपीएलच्या सर्व संघांचे मालक यांच्यामध्ये (31 जुलै) रोजी बैठक होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत प्रशिक्षक गौतम गंभीर करणार प्रयोग! ‘केकेआर-सुनील नरेन’चा फॉर्म्युला वापरुन पाहणार
“फिटनेसचं नाटक सांगून हार्दिकला…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं बीसीसीआयला हिणवलं
टीम इंडियाच्या नव्या जर्सीतील वाढले ‘स्टार’, फोटो पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!