---Advertisement---

RCB vs PBKS: टीम डेव्हिडचे शानदार अर्धशतक! RCBचे पंजाबसमोर 96 धावांचे आव्हान

On: शुक्रवार, एप्रिल 18, 2025 11:06 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 34वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने आहेत. या बंगळुरूचा संघ रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, तर पंजाबचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला आहे. या सामन्याचा टाॅस जिंकून पंजाबने आरसीबीला फलंदाजीसाठी पाचरण केलं होतं. यादरम्यान आरसीबीचा संघ मर्यादित षटकात केवळ 95 धावाच करू शकला.

आरसीबीसाठी सलामीला आलेले स्टार खेळाडू फिल साॅल्ट आणि विराट कोहली संघाला चांगली सुरूवात करून देऊ शकले नाहीत. दोन्ही फलंदाज अनुक्रमे 4 आणि 1 अशा धावसंख्येवर तंबूत परतले. या दोन्ही स्टार फलंदाजांना पंजाबचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने 23 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. आरसीबीसाठी पाटीदार आणि टीम डेव्हिड वगळता कोणताही खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. डेव्हिडने आरसीबीसाठी शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 26 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत 3 षटकांरांसह 5 चौकार लगावले.

पंजाबसाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, मार्को जान्सेन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर झेवियर बार्टलेट 1 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. आता पंजाबचा संघ 96 धावा करण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि यश दयाल

पंजाब किंग्ज- प्रियांश आर्य, नेहल वढेरा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---