रविवारी (दि. 14 मे) आयपीएल 2023 मध्ये पहिला सामना राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात आरसीबी संघाने 112 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना जिंकत आरसीबीने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावत प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या विजयासह आरसीबीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
दोन्ही संघांसाठी करो अथवा मरो अशा स्थितीत असलेल्या या सामन्यात आरसीबी एकतर्फी वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी त्यावर कळस चढवत दणदणीत विजय मिळवून दिला. 100 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवण्याची ही आरसीबीची चौथी वेळ ठरली. त्यांच्यासारखी अशी कामगिरी आयपीएल इतिहासात अद्याप कोणत्याही संघाला करता आली नाही. त्यांच्यानंतर केवळ दोनदा मुंबई इंडियन्स हा कारनामा करू शकले आहेत.
आरसीबीने 2009 मध्ये सर्वप्रथम मुंबईला 2009 मध्ये 144 भावांनी पराभूत केलेले. त्यानंतर 2013 मध्ये केकेआरला 140 धावांनी मात देण्याचा कारनामा त्यांनी केलेला. 2016 मध्ये हैदराबादला 130 धावांनी पराभूत करण्याची कामगिरी त्यांनी केलेली. त्यानंतर आता राजस्थानला देखील त्यांनी पराभूत करत चौथ्यांदा हा पराक्रम करून दाखवला. त्यानंतर मुंबई इंडियन्सने दोनदा आपल्या विरोधी संघाला 100 पेक्षा जास्त धावांनी पराभूत केले आहे.
या सामन्याचा विचार केल्यास, आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार फाफ डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावल्यानंतर, अनुज रावतने केलेल्या 29 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीने 172 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकापासून आरसीबीच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता सुरुवात केली. नियमित अंतराने गडी बाद होत गेल्याने राजस्थानचा डाव 59 धावांवर संपुष्टात आला. यासह राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
(RCB Only Team In IPL History Who Win 4 Times More Than 100 Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
IPLची एकही ट्रॉफी न जिंकणाऱ्या RCBचा भीमपराक्रम! राजस्थानला हरवत नोंदवला खास विक्रम, चेन्नई मागेच
भारतीय दिग्गजाची संघातून केलेली हाकालपट्टी, ब्लॅकमेल करून साधला फायदा; मैदानावर परतताच ठोकलं द्विशतक






