बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फिन एलनने त्याच्या फलंदाजीचे एक शानदार दृश्य सादर केले. पहिल्या टी-20 सामन्यामध्ये तो एकही धाव न करता बाद झाला होता. पण दुसर्या टी -20 सामन्यामध्ये त्याने फलंदाजीची चमक दाखविली आणि रिव्हर्स स्वीप शॉट मारून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने आपली पहिली धाव घेतली. एवढेच नव्हे तर त्याने तस्कीन अहमदच्या चेंडूवर एक लांब षटकार ठोकला, हे पाहून चाहत्यांना खूप आश्चर्य वाटले.
न्यूझीलंडच्या डावाच्या चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने 95 मी. लांबीचा षटकार खेचला. त्याच्या षटकाराचा चेंडू चक्क मैदानातील फ्लडलाईटपेक्षाही उंचावरुन गेला आणि स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला. खरे तर, एलनने या सामन्यात केवळ 17 धावा केल्या; परंतु त्याच्या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार आणि एक उत्तुंग षटकार लावला. टी-20 मध्ये तो किती उपयुक्त फलंदाज आहे? हे त्याने आपल्या खेळीतून दाखवून दिले.
या वेळी आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत त्याने 14 टी-20 सामने खेळले आहेत आणि यात त्याने 182.65 च्या सरसरीने 537 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये त्याची 6 अर्धशतके आहेत. आयपीएल 2021 मध्ये, तो आरसीबी संघासाठी खूप महत्त्वपूर्ण खेळाडू ठरणार आहे. जोश फिलिपच्या जागी आरसीबीने त्याचा संघात समावेश केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो आरसीबीकडून विकेटकीपिंग करतानाही दिसू शकतो.
Out of the park! Finn Allen has six. What a welcome for Taskin. Follow play LIVE with @sparknzsport #NZvBAN pic.twitter.com/YtfCFkrxI8
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 30, 2021
Hello Finn Allen! Underway in international cricket with a reverse for four. Follow play LIVE in NZ from McLean Park with @sparknzsport #NZvBAN pic.twitter.com/gh2em2QuoJ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 30, 2021
अ गटातील क्रिकेटमध्ये त्याचा एक विक्रम देखील आहे. त्याने 50 षटकांच्या सामन्यात 50 चेंडूत शतक ठोकण्याची कामगिरी केली आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सामन्यात त्याने ओटागोविरूद्ध 128 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने केवळ 50 चेंडूत शतक ठोकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
यंदा पंजाब किंग्जचं बदलणार नशीब! ‘हा’ धुरंधर नेटमध्ये मारतोय गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल
आठवतंय का? आजच्याच दिवशी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत टीम इंडियाने गाठली होती विश्वचषकची फायनल






