भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आयोजित होणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धा मानली जाते. जगातील सर्वच खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आतुर असतात. यामागचे कारण म्हणजे या स्पर्धेमधून मिळणारी संपत्ती आणि प्रसिद्धी होय. परंतु आयपीएलमध्ये बरेच मोठे वाद देखील झाले आहेत आणि त्यानंतर बरीच खळबळ देखील उडाली आहे. अशीच एक घटना घटना 2012 ला घडली होती.
आरसीबीच्या खेळाडूने केला मुलीचा विनयभंग
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघातील एका खेळाडूने मोठा गोंधळ घातला आहे. खरं तर आयपीएल 2012 मध्ये आरसीबीकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ल्यूक पोमरसबॅकने अमेरिकन मुलगी जोहान हमीद हिच्यासोबत शरारिक छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. ल्यूकला त्याचे हे कृत्य खूप महागात पडले होते. पिडीत मुलगी हमीदने 17 मे 2012 रोजी नवी दिल्ली येथील हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली. त्यांनी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर ल्यूकला पोलिसांनी अटक केली होती.
विजय माल्याचा मुलगाही फसला होता
या संपूर्ण प्रकरणावर विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याने भाष्य केले होते. त्याने ट्विटरच्या माध्यमातून हमीदच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर सिद्धार्थ माल्यावरही मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. परंतु त्यानंतर या दोन्ही खटल्यांचा कोर्टाबाहेर परस्पर कराराने निकाल लावत हे प्रकरण मिटवण्यात आले होते. पण त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण प्रसार माध्यमाद्वारे खूप चर्चेत आले होते.
आयपीएलचे उर्वरित सामने लवकरच सुरू होईल
दरम्यान आयपीएल 2021चे सामने यावर्षी दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील सामने भारतात आयोजण्यात आले होते. पण भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे आयपीएलमधील खेळाडू आणि कर्मचारीही कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर 29 सामन्यानंतर आयपीएलला मध्येच स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता सप्टेंबर महिन्यांत युएईमध्ये या उर्वरित सामन्यांचे आयोजन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल बोलली ‘ही’ चीअरलीडर; सचिन अन् माहीवरही केले वक्तव्य
‘भारत विश्वचषकात मुद्दाम आमच्याविरुद्ध हारला होता,’ इंग्लंडच्या क्रिकेटरचे वादग्रस्त आरोप
नवीकोरी विंटेज कार अन् जिवाभावाच्या मित्रांसंगे जेवणावर ताव, ‘माही’चा तो फोटो भन्नाट व्हायरल