आज आयपीएल 2025 हंगामातील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने चेन्नईला जिंकण्यासाठी 197 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
आरसीबीसाठी सर्वाधिक धावा कर्णधार रजत पाटीदारने 32 चेंडूत 51 धावा करत त्याने अर्धशतक पूर्ण केले. साल्टने 16 चेंडूत 32 धावा केल्या. विराट कोहलीने 30 चेंडूत 31 धावा, तर देवदत्त पडिकलने 14 चेंडू 27 धावा केल्या. टीम डेविडने आठ चेंडूत 22 धावा केल्या त्याने तीन षटकार ठोकले.
तसेच आजच्या सामन्यात आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार देखील खेळत आहे.
चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट्स नूर अहमदने घेतल्या, त्याने 36 धावा देत चार षटकात तीन विकेट्स घेतल्या. तसेच मथीशा पथीरानाने चार षटकात 36 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विन , खलील अहमद यांनी चेन्नईसाठी एक- एक विकेट्स घेतली.






