रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मंगळवारी (२७ एप्रिल) झालेल्या थरारक सामन्यात बेंगलोरने एका धावेने विजयी पताका झळकावली. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीला ४ विकेटस् गमावत १७० धावा करता आल्या आणि बेंगलोरने हंगामातील पाचवा विजय नोंदवला.
दरम्यान दिल्लीकडून चिवट झुंज देत असलेल्या कर्णधार रिषभ पंत याला बाद करण्यासाठी बेंगलोरचे गोलंदाज झगडताना दिसत होते. सुरुवातीच्या षटकात डीआरएसचा वापर करत एकदा पंत बचावला होता. यावेळी प्रतिस्पर्धी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याचे तोंड पाहण्यासारखे झाले होते.
पावरप्लेनंतर दिल्ली संघ २ बाद ४३ धावा अशा स्थितीत असताना बेंगलोरचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर डावातील सातवे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू जाऊन पंतच्या पॅडला धडकला होता. सुंदरच्या चेंडूवर पंत रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात होता. परंतु चेंडू जास्तच खालून आल्यामुळे त्याच्या पायाला लागला.
असे पाहिले असता, पंत सरळ सरळ पायचित असल्याचे दिसत होता. त्यामुळे मैदानी पंचांनी त्याला बाद करार केले होते. परंतु कर्णधार पंतने त्वरित रिव्ह्यू घेतला. पुढे तिसऱ्या पंचांनी तपासणी केल्यानंतर तो नाबाद असल्याचे दिसले. दुसरीकडे बेंगलोरचा कर्णधार कोहली पंतच्या विकेटचा जल्लोष साजरा करत होता. परंतु डीआरएसच्या मदतीने दिल्लीचा संघनायक बचावल्याचे पाहून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो थक्क होऊन तिसऱ्या पंचांच्या निर्णयाला पाहत होता.
कोहलीच्या याच रिऍक्शनने सामना दर्शकांचे लक्ष वेधले. त्याच्या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1387092746414952452?s=20
Virat Kohli's reaction after he saw the spike on Rishabh Pant's bat on the big screen. pic.twitter.com/hcyP7YJMup
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 27, 2021
I think now the game is between Rishabh Pant and RCB…He has to deliver a captain's knock…..#RCBvDC #RishabhPant #IPL2021
— Subham Karmakar (@ImSubham_13) April 27, 2021
Rishabh Pant and Reviews. Still a better love story than twilight. 😂 #DCvRCB #IPL2021
— O'Neil Rhylet (@mrwildborn7) April 27, 2021
पहिल्यांदा बाद होण्यापासून वाचल्यानंतर पंतने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. ४८ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५८ धावा करत तो नाबाद राहिला. परंतु शेवटच्या चेंडूवर संघाला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता असताना पंतने साधारण चौकार मारला आणि एका धावेने दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
हेटमायरची ५३ धावांची झुंज व्यर्थ, पराभवानंतर त्याची रिऍक्शन पाहून तुमच्याही डोळ्यात तरळतील अश्रू
सलाम भावा! फक्त १ धावेने पराभूत झाल्यानंतर पंत आला रडकुंडीला, विराटने ‘अशी’ कृती करत जिंकले मन
बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा