Jitesh Sharma: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा (RCB) यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा सध्या विदर्भ टी20 लीगमध्ये खेळत आहे. (RCB Jitesh Sharma) तो मास्टर्स ब्लास्टर्स संघाचा कर्णधार आहे. नुकताच, शुक्रवारी (13 जून) जितेशचा संघ सेमीफायनल सामन्यात भारत रेंजर्सशी भिडला. त्यांच्या संघाला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत, आरसीबीच्या या फलंदाजाने अथर्व तायडेच्या गोलंदाजीवर षटकार मारून नेको मास्टर्स ब्लास्टर्सला हरलेली बाजी जिंकवून दिली.
भारत रेंजर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना नेको मास्टर्ससमोर मोठे आव्हान उभे केले. कर्णधार अथर्व तायडेने नाबाद 94 धावांची खेळी केली, ज्यात 7 चौकार आणि 6 षटकार होते. त्यानंतर वरुण बिष्टने केवळ 15 चेंडूत 50 धावांची वादळी खेळी केली. या 2 धडाकेबाज फलंदाजांमुळे संघाने 20 षटकांत 204 धावांपर्यंत मजल मारली.
लक्ष्य खूप मोठे होते. नेको मास्टर्सच्या फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. वेदांत दिघडे आणि अध्यायन डागा यांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावा जोडल्या. त्यानंतर डागा आणि आर्यन मेश्राम यांनी दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. दुसरी विकेट पडल्यानंतर जितेश मैदानात आला. जितेशने मेश्रामसोबत तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली.
शेवटच्या षटकात संघाला 6 धावांची गरज होती. पण जितेशला चौथ्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली. त्यावेळी संघाला 2 चेंडूत 5 धावा हव्या होत्या. जितेशने पाचव्या चेंडूवर धाव घेतली नाही. त्यानंतर, शेवटच्या चेंडूवर षटकार मारून जितेशने संघाला विजय मिळवून दिला. (Jitesh Sharma last ball six) याचबरोबर त्याचा संघ विदर्भ टी20 लीगच्या फायनलमध्ये पोहोचला. (Vidarbha T20 League Final)
Jitesh Sharma smashed 6 on the last ball when his team required 5 in 1.
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) June 14, 2025
pic.twitter.com/ki47gjaGwk





