---Advertisement---

IPL 2026: आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचा भारतीय संघात प्रवेश निश्चित! दिनेश कार्तिकचं मोठं विधान

On: मंगळवार, एप्रिल 7, 2026 6:56 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार सध्या सुरू आहे आणि अशातच आरसीबी (RCB) संघाकडे सध्या अनेक मॅच-विनर खेळाडू आहेत, ज्यामध्ये युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने (Devdtta padikkal) सर्वांत जास्त प्रभावित केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पडिक्कल ज्या प्रकारे खेळाचे रूप पालटत आहे, ते पाहून संघाचा मेंटर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) खूप खूश आहे.

कार्तिकने पडिक्कलचे तोंडभरून कौतुक केले असून, तो जर असाच खेळत राहिला तर लवकरच टीम इंडियामध्ये त्याची जागा पक्की होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

जिओहॉटस्टारवर बोलताना दिनेश कार्तिकने पडिक्कलचे कौतुक करताना सांगितले की, पडिक्कल अतिशय दर्जेदार क्रिकेटिंग शॉट्स खेळत आहे. तो ज्या पद्धतीने चेंडू टोलवत आहे, ते बघण्यासारखे आहे. जर त्याने अशीच फलंदाजी सुरू ठेवली, तर त्याला जास्त काळ भारतीय टीमपासून दूर ठेवता येणार नाही.

तो एक उत्तम खेळाडू आहे आणि त्याने घरगुती क्रिकेटमध्येही खूप धावा केल्या आहेत. ड्रेसिंग रूममध्येही तो एका लीडरची भूमिका पार पाडत आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तो आपल्या विचारांनी आणि नेतृत्वगुणांनी टीमला मदत करत आहे. त्याला अशा रूपात पाहणे खूप आनंददायी आहे. आयपीएल स्पर्धेनंतर देवदत्त पडिकलचे टीम इंडियात पदार्पण होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---