---Advertisement---

RCB संघ ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर, पण ‘या’ दोघांनी घातला मोडता

On: गुरूवार, मे 15, 2025 10:57 AM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा 18 वा हंगाम एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. पण आता परिस्थिती पुन्हा एकदा सामान्य झाली आहे. बोर्डाने उर्वरित वेळेत सामने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर परदेशी खेळाडू पुन्हा एकदा देशात जमू लागले आहेत. क्रीकइन्फोच्या वृत्तानुसार, वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघातील तरुण अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्ड आणि लियाम लिव्हिंगस्टोन देखील भारतात पोहोचले आहेत. दोन्ही खेळाडू गेल्या बुधवारी त्यांचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाले आहेत.

रोमारियो शेफर्ड आणि लियाम लिव्हिंगस्टोन निश्चितच आरसीबीमध्ये पुन्हा सामील झाले आहेत, परंतु जोश हेझलवूड आणि लुंगी एनगिडी यांची परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. 29 वर्षीय आफ्रिकन वेगवान गोलंदाज एनगिडीला पुढील महिन्यात जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी राष्ट्रीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आरसीबीच्या कपाळावरील आठ्या वाढल्या आहेत.

स्पर्धेतील 58 सामने पूर्ण झाल्यानंतर, आरसीबी संघ 11 सामन्यांत आठ विजय आणि फक्त तीन पराभवांसह 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने पहिले स्थान पटकावले आहे. गिल अँड कंपनीनेही 11 सामन्यांत आठ विजय मिळवले आहेत. तथापि, धावगतीच्या बाबतीत ते आरसीबीपेक्षा पुढे आहेत.

रजत पाटीदार, विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देव दत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, मोहित सिंह, मोहित नंदनंद, मोहित सिंह, रजत पाटीदार. स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड आणि नुवान तुषारा. हा आरसीबीचा आयपीएल 2025चा संघ आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---