इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये दमदार कामगिरी करत असतानाच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलवर दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीचे निधन झाले होते. त्यामुळे हर्षलने आपल्या बहिणीच्या अंतिम संस्कारासाठी चालू हंगामातून ब्रेक घेतला होता. यानंतर त्याने आता पुनरागमन केले आहे. तसेच, तो परतल्यानंतर त्याने एक सामनाही खेळला आहे. अशात त्याने आपल्या बहिणीच्या आठवणीत वेगवान गोलंदाज हर्षलने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
हर्षल पटेलने बहिणीच्या आठवणीत केली भावूक पोस्ट
हर्षल पटेलने (Harshal Patel) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बहिणीचा फोटो शेअर केला. तसेच, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तू दयाळू आणि आनंदी व्यक्ती होती. तू हसऱ्या चेहऱ्याने आयुष्यातील कठीण गोष्टींचा सामना केला, शेवटच्या श्वासापर्यंत केला.”
https://www.instagram.com/p/Ccda9IQNDZh/?utm_source=ig_embed&ig_rid=c8c5fd5f-bc36-44bf-9fa0-6c1fe354c25b
“जेव्हा मी भारतात येण्यापूर्वी तुझ्यासोबत रुग्णालयात होतो, तेव्हा तू मला म्हणाली होती की, ‘माझी काळजी करू नको आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रित कर.’ या शब्दांमुळेच मला शेवटच्या सामन्यात मैदानावर खेळण्याचे धैर्य मिळाले. आता मी तुझा सन्मान करण्यासाठी एवढेच करू शकतो. तुला माझा अभिमान वाटेल, ते सर्व मी करेल. मला प्रत्येक क्षणी तुझी आठवण येईल. माझ्या वाईट आणि चांगल्या काळात मला तुझी आठवण येईल. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात परतला हर्षल
हर्षल पटेल मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान खेळला होता. यानंतर त्याला त्याच्या बहिणीच्या निधनाची वाईट बातमी मिळाली. त्यानंतर तो बायो-बबलमधून बाहेर पडत घरी परतला होता. हर्षलने यानंतर संघात पुनरागमन केले. मात्र, क्वारंटाईनच्या नियमांमुळे तो पुढील सामना खेळू शकला नाही. या सामन्यामध्ये संघाला हर्षलची कमतरता जाणवली. त्यामुळे संघ चेन्नई सुपर किंग्स पराभूत झाला. पुढील सामन्यात हर्षल पटेलचे पुनरागमन झाले आणि संघाने दिल्ली कॅपिटल्सला १६ धावांनी पराभूत केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट
मानहानीकारक पराभवानंतर जडेजा झाला व्यक्त; म्हणाला, त्या कारणामुळे आम्ही हरलो