आयपीएल हा भारतीय क्रिकेटचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आयपीएलचे हंगाम चालू नसले तरी आयपीएल फ्रॅंचाइझी आपल्या खेळाडूंबद्दल सतत पोस्ट करत चर्चेत असतात. तर कधी भारतीय क्रिकेटच्या आठवणींंचा उजाळा करणारे पोस्ट टाकत असतात. तसेच काही ट्वीट रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर केले आहे. ज्यामध्ये त्यांनी टी२० विश्वचषकात भारताने नोंदवलेल्या एका विक्रमाची आठवण करुन दिली आहे.
#TeamIndia holds the record of beating England by the highest margin of runs in T20I history. 🔥
Harbhajan Singh claimed 4️⃣ crucial wickets to propel 🇮🇳 to a remarkable victory against 🏴 in a group fixture of the 2️⃣0️⃣1️⃣2️⃣ ICC World T20. 💥#PlayBold #ENGvIND pic.twitter.com/MDaDUJUV6u
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) July 9, 2022
आरसीबीने आपल्या अधिकृत अकाउंटवर केलेल्या ट्वीटमध्ये लिहले की, “आंतरराष्ट्रीय टी२० इतिहासात इंग्लंडला सर्वाधिक ९० धावांच्या फरकाने पराभूत करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. २०१२ आयसीसीच्या टी२० विश्वचषकाच्या लीग सामन्यात इंग्लंडविरुद्ध उल्लेखनीय विजय मिळवण्यासाठी हरभजन सिंगने 4 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या.”
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)