अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत फक्त 3 सामने खेळले आहेत. मात्र, त्यातही त्याने संघाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. 50 लाखांमध्ये ताफ्यात सामील झालेल्या रहाणेने त्याचा तिसरा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळला. त्याने यादरम्यान छोटेखानी खेळी केली. त्यात 2 षटकारांचा समावेश होता. यामधील एक षटकार त्याने इतका जोरात मारला की, सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.
झाले असे की, बेंगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. तसेच, धावफलकावर 200 हून अधिक धावा लावल्या. यावेळी चेन्नईने पहिली विकेट लवकर गमावली होती. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि अजिंक्य रहाणे यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली.
रहाणे यावेळी खूपच आक्रमक दिसत होता. त्याने बाद होण्यापूर्वी 20 चेंडूत 37 धावा केल्या. यामध्ये 2 गगनचुंबी षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. या 2 षटकारांपैकी एक षटकार इतका लांब होता की, चेंडू स्टेडिअमच्या छतापर्यंत पोहोचला. रहाणेने हा षटकार पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजयकुमार विषक याच्या गोलंदाजीवर मारला. या षटकाराची लांबी 91 मीटर इतकी होती.
https://twitter.com/BilluPinkiSabu/status/1647970366432636928?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1647970366432636928%7Ctwgr%5E3870d223b4e9f616d0934f7ba97f4393e7a3f109%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fcricket.pundit365.com%2Frcb-vs-csk-watch-im-rubbing-my-eyes-sunil-gavaskars-reaction-gigantic-six-by-ajinkya-rahane%2F
A 91M six by Ajinkya Rahane! pic.twitter.com/OqtpQLTuDx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2023
अजिंक्य रहाणे याचा हा षटकार पाहून चेन्नईचे चाहते खुश झाले, तर बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याचे तोंड पडले होते. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, रहाणे याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खेळलेल्या 3 सामन्यात 65 चेंडूत 129 धावा केल्या आहेत. त्याने खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट हा कौतुकास्पद राहिला आहे. तो त्याच्या बॅटमधून टीकाकारांना दाखवून देत आहे की, तो प्रत्येक क्रिकेट प्रकारात खेळू शकतो.
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऋतुराजची विकेट गमावल्यानंतर चेन्नईने दमदार पुनरागमन केले. त्यांनी कॉनवेच्या 83 आणि शिवम दुबेच्या 52 धावांच्या खेळीच्या जोरावर 6 विकेट्स गमावत 226 धावांचा टप्पा गाठला. आता हा सामना जिंकण्यासाठी बेंगलोर संघ 227 धावा करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (rcb vs csk ajinkya rahane hit 91 meter six ball land on the roof of stadium see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॉनवे-दुबेच्या झुंजार खेळीच्या जोरावर चेन्नईने पार केला 200चा आकडा, बेंगलोरपुढे भलेमोठे आव्हान
सीएसकेने रहाणेवर लावलेली 50 लाखांची बोली, पण पठ्ठ्याकडून कोटींची कामगिरी; 3 डावात केल्या ‘एवढ्या’ धावा