आयपीएल 2025 च्या 52 व्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे, ज्यामध्ये आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नईला हरवण्यासाठी मैदानात उतरेल.
या हंगामात, चेन्नईने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 2 सामने जिंकण्यात यश मिळाले आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10 सामन्यांमध्ये 7 विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या आरसीबीचे 14 गुण आहेत. ते प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित करण्यासाठी लक्ष केंद्रित करतील. आयपीएल 2025 मध्ये दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. यापूर्वी, 28 मार्च रोजी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता तेव्हा आरसीबीने सीएसकेचा 50 धावांनी पराभव केला होता.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत 34 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये सीएसकेने 21 सामने जिंकले आहेत तर आरसीबीने 12 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला. जर गेल्या 5 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईचा थोडासा दबदबा आहे. सीएसकेने गेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत तर आरसीबीने 2 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल, सुयश शर्मा
चेन्नई सुपर किंग्ज : एमएस धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), शेख रशीद, आयुष म्हात्रे, दीपक हुड्डा, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाॅल्ड ब्रेविस, शिवम दुबे, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथीराना