आरसीबीच्या संघाने WPL 2024मध्ये मुंबई इंडियन्सचा अवघ्या 6 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. 136 धावांच्या साध्या लक्ष्याचा बचाव करत स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. विजयासह आरसीबीच्या संघाने WPL च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत मोठा विजय मिळवला आहे. मात्र आता कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष 17 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे.
RCB आणि दिल्ली यांच्यातील WPL 2024 चा अंतिम सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तसेच हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. या हंगामात WPL चा एक नवीन विजेता संघ मिळणार आहे. तर दिल्ली आणि आरसीबीला अद्याप एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही, आता अंतिम सामन्यात कोण आपला झेंडा फडकवणार हे बघावे लागणार आहे. तसेच आजपर्यंत कोहलीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, पण आता स्मृती मानधना कोहलीचे आणि आरसीबी संघाचे स्वप्न पूर्ण करू शकते.
याबरोबरच आरसीबीने डब्ल्यूपीएलमध्ये जिंकल्यास 16 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल. तसेच 2008 पासून आरसीबीचे करोडो चाहते त्यांच्या संघाने एकदा तरी ट्रॉफी जिंकावी या प्रतिक्षेत आहेत. मात्र आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघाला आतापर्यंत अपयश आले आहे. त्यामुळे आता WPL 2024 मध्ये RCB जिंकताच आरसीबीच्या करोडो चाहत्याते स्वप्न पूर्ण होईल.
FINAL BERTH ✅@RCBTweets join the @DelhiCapitals for a shot at the ultimate prize 🏆#TATAWPL | #MIvRCB | #Eliminator pic.twitter.com/R0YL3bE9EP
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2024
दरम्यान, बंगळुरूची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी जबरदस्त फॉर्ममध्ये असून तीने नॉकआऊट लीगच्या सामन्यात मुंबईला पराभूत करण्यात महत्वांचे योगदान दिले आहे. याच कारणामुळे पेरीला दोन्ही सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आले. याआधी या खेळाडूने मुंबईविरुद्धच्या साखळी सामन्यात 4 षटकात अवघ्या 15 धावा देऊन 6 बळी घेतले होते. यानंतर त्याने बॅटने 40 प्लस धावाही केल्या. यानंतर, एलिमिनेटर सामन्यातही पेरीने विस्कळीत होणाऱ्या आरसीबीला फलंदाजीमध्ये हाताळले आणि 50 चेंडूत 66 धावा केल्या, ज्यामुळे बंगळुरू संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ऋषभ पंत ते मिचेल स्टार्क पर्यंत, आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी हे ‘7’ खेळाडू पुनरागमन करण्यासाठी सज्ज
- IPL 2024 : ध्रुव जुरेलने IPL च्या पहिल्या पगारातून केले ‘हे’ काम, जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क