सोफी मोलिनक्स हिने डब्ल्यूपीएल 2024च्या अंतिम सामन्यात एकाच षटकात चित्र पालटले. आरसीबीने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागली. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील आठव्या षटकात सोफी मोलिनक्सने एक-दोन नाही तर तीन फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
पहिल्या विकेटसाठी शफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग यांच्यात 64 धावांची भागीदारी झाली. पण आठव्या षटकात सोफी मोलिनक्स (Sophie Molineux) गोलंदाजीला आली. षटकातील पहिल्याच चेंडूवर तिने शफालीला जॉर्जिया वेअरहॅम हिच्या हातात झेलबाद केले. शफालीने वैयक्तिक 44 धावांची खेळी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेली जेमिमा रॉड्रिग्ज दोन चेंडूत शुन्य धावा करून आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाली. याच षटकातील चौथ्या चेंडूवर ॲलिस कॅप्सी गोल्डन डकवर बाद झाली. म्हणजे संघाची धावसंख्या 64 अशताना दिल्लीने लागोपाट तीन विकेट्स गमावल्या.
MOLINEUX – PURPLE CAP HOLDER IN WPL 2024….!!! pic.twitter.com/jM9U2z7jHR
— Johns. (@CricCrazyJohns) March 17, 2024
पुढे दिल्लीच्या डावातील 11व्या षटकात कर्णधार मेग लॅनिंग हिनेही विकेट गमावली. श्रेयांका पाटील हिने षटकातील चौथ्या चेंडूवर लॅनिंगला पायचित पकडले. त्यावेळी संघाची धावसंख्या 74 होती, तर लॅनिंगने वैयक्तिक 23 धावा केल्या. (Sophie Molineux claims three significant wickets in a single over.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एस मेघना, एलिस पेरी, दिशा कासट, रिचा घोष (यष्टीरक्षक), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे.
महत्वाच्या बातम्या –
‘मी यासाठी आयुष्यभर धोनीचा आभारी राहीन…’, वाचा अश्विन नक्की कशाविषयी बोलतोय
WPL Final । नाणेफेकीत मेल लेनिंगची बाजी, या प्लेइंग इलेव्हनसह दोन्ही संघ फायनलसाठी सज्ज