बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडीयमवर आज संध्याकाळी दिल्ली डेरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंन्जर बेंगलोर या दोन संघांची लढत होणार आहे . दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या बेंगलोर संघ या पर्वात पहिल्यांदाच आपल्या घरच्या मेदानावर खेळणार असून दिल्लीचा हा या पर्वामधील पहिलाच सामना आहे. बेंगलोर संघाला आयपीएल १० च्या पहिल्याच सामन्यात हैद्राबाद संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता हाच संघ दिल्ली विरुद्ध विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे.
मागील सामन्यात ख्रिस गेल चांगल्या लयमध्ये दिसला पण त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. भारताकडून चांगली कामगिरी करणारा पुण्याचा केदार जाधव ही या संघात आहे आणि तो ही चांगला खेळ करू शकतो हे मागील सामन्यात दिसून आलेले आहे . तसेच टायमल मिल्सला मागील सामन्यात चांगला खेळ करता आलेला नाही. दिल्लीने या वर्षी आपली फलंदाजी मजबूत करण्यासाठी न्यूझीलंडचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कोरी अँड्रेसनला संघामध्ये सामाविष्ट केला आहे. दिल्लीच्या संघाची धुरा अनुभवी झहीर खानकडे आहे तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बेंगलोर संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू वॉटसन सांभाळत आहे.
आतापर्यंत या दोन संघात झालेल्या सामन्यांमध्ये बेंगलोरने ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ६ सामन्यांमध्ये दिल्लीने विजय मिळवला आहे.