गुरुवारी (१९ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गुजरात टायटन्सवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी केली आणि आरसीबीने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या, आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी स्वतःच्या संघासाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले. या दोघांच्या खेळीनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत काही फेरबदल पाहायला मिळाले.
गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजीसाठी आली आणि त्यांची वरची फळी स्वस्तात बाद झाली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम होता. हार्दिकने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या. तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) ३८ चेंडूत ४४ धावा करू शकला. आरसीबीसाठी माजी कर्णधार आणि सलामीवीर विराट कोहलीने ७३ धावांची सर्वात मोठी खेळी केली आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
या सामन्यानंतर आयपीएल २०२२ मध्ये ऑरेंज कॅप पटकावण्याती स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. सध्या आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये जोस बटलर हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. बटलरने १३ डावांमध्ये ६२७ धावा केल्या आहेत आणि तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. गुजरात-आरसीबी सामन्यानंतर फाफ डू प्लेसिस या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. फाफने १४ सामन्यांमध्ये ४४३ धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याने १३ सामन्यांमध्ये ४१३ धावा केल्या आहेत. हार्दिक आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हार्दिक आणि फाफने गुरुवारी खेळलेल्या सामन्यात जे प्रदर्शन केले, त्याचा फटका डेविड वॉर्नर, शिखर धवन, दिपक हुड्डा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना बसला आहे. हे सर्वजन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एका – एका स्थानाने खाली घसलले आहेत.
उभय संघातील सामन्याचा विचार एकंदरीत केला, तर प्रथम फलंदाजी करताणा गुजरातने ५ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य ८ विकेट्स राखून आणि १८.४ षटकांमध्ये गाठले.
आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू (६७ सामन्यापर्यंत)
६२७ धावा – जोस बटलर (१३ सामने)
५३७ धावा – केएल राहुल (१४ सामने)
५०२ धावा – क्विंटन डी कॉक (१४ सामने)
४४३ धावा – फाफ डू प्लेसिस (१४ सामने)
४२७ धावा – डेव्हिड वॉर्नर (११ सामने)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मगत्वाच्या बातम्या-
आता फक्त मोजायचं! ‘करा अथवा मरा’ सामन्यात विराट कोहलीची फिफ्टी, रचले विक्रमांचे मनोरे
इंग्लंड दौऱ्यापूर्वी जडेजा आणि सूर्यकुमारच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट, संघात निवड होणे निश्चित; पण…