आयपीएल 2023चा 43वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना लखनऊमध्ये खेळला गेला असून आरसीबीचे फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसले. आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिस याने सर्वाधिक 44 धावा केल्या. लखनऊसाठी अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा याने दोन विकेट्स घेतल्या आणि आयपीएल इतिहासातील मोठा विक्रम नावावर केला.
आयरसीबीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी आरसीबीचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. निर्धारित 20 षटकात आरसीबीने 9 विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या 126 धावा केल्या. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 40 चेंडूत 44 धावा साकारल्या. आरसीबीसाठी नवीन उल हक याने या सामन्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अमित मिश्रा (Amit Mishra) याने 3 षटके गोलंदाजी केली आणि यात 21 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या.
सोमवारी (1 मे) आरसीबीविरुद्ध घेतलेल्या 2 विकेट्सनंतर अमित मिश्रा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याचा विक्रम मोडीत काठला. मिश्राच्या नावावर आता एकूण 172 आयपीएल विकेट्सची नोंद झाली आहे. यापूर्वी मिश्रा, मलिंका, रविचंद्रन अश्विन आणि पियुष चावला यांच्या नावावर प्रत्येकी 170-170 धावांची नोंद होती. या यादीत पहिला क्रमांक ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo), तर दुसरा क्रमांक युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा आहे.
सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणारे गोलंदाज
183 – ड्वेन ब्रावो
178 – युझवेंद्र चहल
172* – अमित मिश्रा
170 – मलिंगा/अश्विन/चापला
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर सलामीवीला आलेला विराट कोहली 30 चेंडूत 31 धावा करू शकला. त्याव्यतिरिक्त आरसीबीचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. आरसीबीच्या एकूण 8 फलंदाजांनी एक आकडी धावसंख्यावर विकेट गमावल्या. (IPL 2023 RCB vs LSG Amit Mishra becomes the 3rd highest wicket taker in IPL history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्ध विराट कोहलीची नकोशी कामगिरी, मोठा विक्रम करण्याची संधीही हुकली
दोन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र! डब्ल्यूटीसी फायनलआधी पुजाराच्या नेतृत्वात खेळणार स्टीव स्मिथ