---Advertisement---

आरसीबी जिंकली पण विराट हरला, कोहलीच्या नावापुढे एक नकोसा ‘डाग’ लागला

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 11:28 AM
---Advertisement---

मुंबई । आयपीएल 2020 च्या 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या, त्या प्रत्युत्तरात मुंबईच्या संघानेही 201 धावा केल्या. तथापि, या सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने बाजी मारली.

या सामन्यादरम्यान काही विक्रमांची नोंद झाली. या सामन्यात झालेल्या विक्रमांवर एक नजर टाकूया…

1. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा मुंबई इंडियन्स विरूद्ध हा 10 वा विजय होता. यापूर्वी आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 25 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 9 सामने बेंगलोर संघाने जिंकले होते. त्याचवेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने 16 सामने जिंकले होते.

2. आयपीएल 2020च्या 10 सामन्यात मुंबई आणि बेंगलोर यांच्यात खेळलेला हा दुसरा सुपर ओव्हर सामना आहे.

3. एबी डिविलियर्सने या सामन्यात अर्धशतक झळकावत मुंबईविरुद्ध सलग 3 डावात 50 पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.

4.  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात 1 षटकार ठोकला, ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात 200 षटकार ठोकणारा चौथा खेळाडू ठरला. या सामन्यापूर्वी हिटमॅन रोहितने आयपीएलमध्ये 199 षटकार लगावले होते.

5. एबी डिविलियर्सने या सामन्यात 35 वे अर्धशतक ठोकले. डिविलियर्सने आयपीएलमध्येही 3 शतके ठोकली आहेत.

6. या सामन्यासह, आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ पराभूत झाला आहे.

7. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात आजपर्यंत 200 पेक्षा जास्त धावांचे आव्हान पार केले नाही. इतका मोठा संघ  असूनही मुंबईचा संघ हा विक्रम करू शकला नाही.

8. विराट कोहली आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळला आहे, पण त्याने एकही चौकार किंवा षटकार लगावलेला नाही.

9. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 व्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांच्यात ही भागीदारी झ‍ाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---