आयपीएल 2025चा 34वा सामना आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे सामना उशिरा सुरु झाला शिवाय हा सामना 14-14 षटकांचा झाला. पंजाब किंग्जने या सामन्यात आरसीबीचा 5 विकेट्सने पराभव. आरसीबीने पहिल्या डावात खेळताना 14 षटकात 9 गडी गमावून 95 धावा केल्या, प्रत्युत्तरात पंजाबने 12.1 षटकात लक्ष्याचा पाठलाग केला.
पहिल्या डावात खेळताना आरसीबीची फ्लाॅप कामगिरी पाहायला मिळाली. कर्णधार रजत पाटीदार व टिम डेव्हिड व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. पहिल्या षटकात फिल साॅल्ट 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली देखील 1 धाववर परतला. संघाने ठराविक अंतराबवर विकेट्स गमावत रहिल्याने मोठे लक्ष्य गाठता आले नाही. शेवटच्या षटकात टिम डेव्हिडने फटकेबाजी करत आरसीबीला 95 धावांपर्यंत नेले. त्याने 26 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन (4) जितेश शर्मा (2) कृणाल पांड्या (1) सपशेल फ्लाॅप ठरले.
2️⃣ sharp catches 🫡
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
2️⃣ early strikes ✌
Arshdeep Singh and #PBKS with a solid start ⚡
Updates ▶ https://t.co/7fIn60rqKZ #TATAIPL | #RCBvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/jCt2NiuYEH
लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने 53 धावांत 4 विकेट गमावल्या, शेवटच्या षटकांपर्यंत सामना स्पर्धात्मक दिसत होता पण नेहल वढेराने शानदार खेळी करत पंजाबचा विजय निश्चित केला. नेहलने 19 चेंडूंत 3 षटकार आणि तितक्याच चौकारांसह नाबाद 33 धावा केल्या. पंजाब किंग्जने 11 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठून आणखी एक शानदार विजय नोंदवला.