इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १३ वा सामना राजस्थान राॅयल्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना आरसीबीने ४ विकेट्सने जिंकला. या सामन्याचा खरा हिरो ठरला दिनेश कार्तिक. त्याने शेवटच्या षटकांमध्ये २३ चेंडूत ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. आरसीबीचा हा या हंगामातील सलग दुसरा विजय आहे. तसेच बेंगलोर संघाने आयपीएलमधील १०० वा विजय नोंदवला आहे.
या सामन्यात बेंगलोरचा शाहबाज बाद झाल्यानंतर ३१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेल (Harshal Patel) मैदानात आला. शेवटच्या षटकात संघाला ३ धावांची गरज होती. त्यावेळी हर्षल पटेलने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यशस्वी जयस्वालविरुद्ध एक मोठा षटकार लगावला आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने एका षटकाराच्या मदतीने ४ चेंडूत ९ धावा केल्या.
Whatta match
Dinesh Karthik the game changer 😭😭😭 pic.twitter.com/bFx5msNQBI— 𝖙𝖆𝕹𝖎𝖘𝖍𝖆 || 🦋🌻🫶 (@Tanisha__27) April 5, 2022
हर्षल पटेलने फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही सर्वांना आकर्षित केले. त्याने गोलंदाजीत ४ षटकात १८ धावा देत १ विकेट घेतली. त्याने राजस्थानच्या युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलला बाद केले. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ६६ सामन्यांत २२.८४ च्या सरासरीने ८२ विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी केली. राजस्थानने २० षटकात ३ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या. जाॅस बटलरने सर्वाधिक ७० धावा केल्या. हे लक्ष्य आरसीबीने १९. १ षटकातच गाठले. दिनेश कार्तिकने ४४ तर शाहबाजने ४५ धावा केल्या. फाफ डू प्लेसिसने २९ धावा केल्या. त्याने २३ चेंडूत १९१.३० च्या स्ट्राइक रेटने ४४ धावा केल्या. या दरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. आरसीबी संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सामना कधी हातातून निसटला कळलंच नाही’, आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनची कबुली
‘क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची वेळ आली नाही’, कार्तिकने सांगितले आयपीएल २०२२मधील यशाचे कारण