---Advertisement---

कोहलीला बाद करणे क्रिकेटरच्या पडले पथ्यावर, दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

---Advertisement---

जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज विराट कोहलीला बाद करणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणारा गोलंदाज टी नटराजनचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. 21 सप्टेंबर रोजी टी-नटराजनने दुबईत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीला तंबूत पाठवले. यामुळे त्याने विशेष यादीत स्थान मिळविले आहे.

सामन्याच्या 15.5 षटकांत टी नटराजनने विराट कोहलीला झेलबाद केले. विराटने 13 चेंडूत 107.69 च्या स्ट्राइक रेटने 14 धावा केल्या. हा आयपीएलमधील नटराजनचा पहिला बळी होता. यापूर्वी आयपीएलमध्ये देश-विदेशातील अन्य 7 गोलंदाजांनी पहिला बळी म्हणून विराट कोहलीला बाद केले आहे. त्यांची यादीत खाली दिलेली आहे.

अ‍ॅल्बी मॉर्केल,  मिशेल मॅक्लेनघन, आशिष नेहरा, अशोक डिंडा, चैतन्य नंदा, डग ब्रेसवेल, जसप्रीत बुमराह, टी. नटराजन

खरं तर, 2016 मध्ये चॅम्पियन असलेल्या सनरायझर्स संघाने 2018 मध्ये टी नटराजनला संघात घेतले होते. यापूर्वी 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने 3 कोटीमध्ये त्याला विकत घेतले होते. त्याची मूळ किंमत 10 लाख रुपये होती. मात्र 2016 मध्ये आयपीएलशी जोडल्यानंतर तब्बल ४ वर्षांनी टी नटराजनला आयपीएल 2020 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

आरसीबी संघाने युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल आणि अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सच्या अर्धशतकांच्या मदतीने सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएलच्या सामन्यात पाच बाद 163 धावा केल्या. आयपीएलमधील पहिला सामना खेळत पडीक्कलने 42 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या, तर डिविलियर्सने 30 चेंडूंत 51 धावा फटकावल्या, ज्यात चार चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. पॉवरप्लेमध्ये 53 धावा देऊन मिचेल मार्शच्या दुखापतीनंतरही पुनरागमन करणाऱ्या सनरायझर्सच्या गोलंदाजांचे कौतुक करावे लागेल. विजय शंकर, टी नटराजन आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---