---Advertisement---

RCBचा ऐतिहासिक विजय; रजत पाटीदारने 18 वर्षांचा वनवास संपवला

---Advertisement---

आयपीएलच्या 18व्या हंगामात अखेर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आपल्या चाहत्यांच्या बहुप्रतिक्षित स्वप्नाला साकारत पहिले विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत आरसीबीने आयपीएल 2025 च्या ट्राॅफीवर आपले नाव कोरले.

RCB ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सची टीम 20 षटकांत 184 धावांपर्यंतच पोहोचू शकली. या ऐतिहासिक विजयात कर्णधार रजत पाटीदारचे नेतृत्व निर्णायक ठरले. पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण आणि प्रभावशाली कामगिरी करत अखेर जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, रजत पाटीदार हा आरसीबीसाठी आयपीएल ट्राॅफी जिंकवून देणारा पहिला कर्णधार ठरला आहे.

क्रुणालने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. भुवनेश्वर कुमारनेही 2 बळी घेतले. तर विराट कोहलीने 43 धावांची संयमी खेळी करत RCBला भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले. आरसीबीच्या विजयानंतर संघाच्या खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. वर्षानुवर्षे जेतेपदासाठी झगडत आलेल्या संघाने अखेर यशाचा सर्वोच्च टप्पा गाठत इतिहास रचला आहे.

या विजयाने आरसीबीच्या क्रिकेटप्रेमी चाहत्यांना आनंदाचा क्षण दिला असून, संपूर्ण क्रिकेटविश्वात या विजयानंतर आरसीबीचे कौतुक केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---