---Advertisement---

RCB vs MI: बेंगलोरचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघात धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री

On: शनिवार, एप्रिल 9, 2022 7:11 PM
RCB-vs-MI
---Advertisement---

पुणे। इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १८वा सामना शनिवारी (दि. ०९ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता नाणेफेक झाली. यामध्ये बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबई आयपीएल २०२२मधील आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

बेंगलोर संघात एक बदल झाला आहे. या सामन्यात शेरफेन रुदरफोर्डच्या जागी ग्लेन मॅक्सवेलची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे मुंबईबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्यातही दोन बदल झाले आहेत. डॅनियल सॅम्सच्या जागी रमणदीप सिंग आला आहे, तर टायमल मिल्सची जागा जयदेव उनाडकटने घेतली आहे.

मुंबईने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यातील एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाहीये. दुसरीकडे ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे.

आमने- सामने कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स (Royal Challengers Bangalore And Mumbai Indians) संघ आतापर्यंत २९वेळा आमने-सामने आले आहेत. यादरम्यान मुंबईने सर्वाधिक विजय मिळवले आहेत. मुंबईने १७ वेळा, तर बेंगलोरने १२ वेळा विजय मिळवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

गुजरातच्या ‘दबंग’ कामगिरीमुळे अमित मिश्राही झाला हैराण; म्हणाला, ‘अशीच कामगिरी केली, तर इतर प्रशिक्षकही…’

स्वत:च धावला आणि रनआऊटही झाला, तरीही हार्दिकने संघ सहकाऱ्यावर काढला राग; पाहा Video

‘काही दिवस असे असतात, जेव्हा मोठे शॉट्स खेळणे…’, सामनावीर ठरलेल्या शुबमन गिलचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---