आयपीएल 2025 स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हा सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ चेपॉक मध्ये समोरासमोर येतील. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण चेपॉक मध्ये मागच्या 17 वर्षात आरसीबी चेन्नईला हरवू शकली नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खराब रेकॉर्ड राहिलेल आहे. विराट कोहलीचा आरसीबी संघ 2008 पासून चेपॉक मध्ये जिंकू शकला नाही. शेवटच्या वेळेस आरसीबीला या मैदानावर पहिल्या हंगामात विजय मिळाला होता.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड नेहमीच जड राहिलेलं आहे. रेकॉर्ड बघायचे झाल्यास दोन्ही संघ सारखेच आहेत, चेन्नईने आरसीबी विरुद्ध आतापर्यंत 21 सामने जिंकलेले आहेत. तसेच आरसीबीला 11 सामान्यात विजय मिळाला आहे. दोन्ही संघातील मागच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास चेन्नई 3-2 ने पुढे आहे.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी मदतीची ठरते. या स्टेडियमवर जास्त मोठी धावसंख्या पहायला मिळत नाही. नव्या चेंडूने इथे धावा करणे सोपे आहे, पण एकदा चेंडू जुना झाला तर थांबून थांबून धावा कराव्या लागतात. अशा परिस्थितीत फिरकीपटू येथे जास्त प्रभावी ठरतात. चेन्नईचा संघ येथे तीन फिरकीपटूं सोबत उतरेल आरसीबीकडे फिरकीपटूंमध्ये 4 पर्याय आहेत.
चेन्नई सुपर किंग्स संघ
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड़ (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, शिवम दुबे, सॅम करन, रवींद्र जड़ेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नाथन एलिस, खलील अहमद, विजय शंकर, जेमी ओवरटन, श्रेयस गोपाल, डेवोन कॉनवे, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, मथीशा पथिराना, गुरजापनीत सिंह, शेख रशीद, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्दार्थ सी आणि वंश बेदी.
रॉयल चैलेंजर्स बंगळुरू संघ
फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), टिम डेविड, क्रुणाल पंड्या, रसिख दार सलाम सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल, अभिनंदन सिंह, मनोज भांडागे, रोमारियो शेफर्ड, स्वप्निल सिंह, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, जैकब बेथेल, मोहित राठी आणि स्वास्तिक चिकारा.




