---Advertisement---

RCBचा प्लेऑफमध्ये प्रवेश होताच मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूला केले संघात सामील!

On: गुरूवार, मे 22, 2025 3:32 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आली आहे. तत्पूर्वी रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वातील आरसीबीने (RCB) शानदार पद्धतीने प्रदर्शन करत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. आता सर्वांच्या नजरा प्लेऑफमध्ये होणाऱ्या सामन्यांवर टिकून आहेत. सध्या आरसीबी पॉईंट्स टेबल मध्ये 17 गुणांनी दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर आरसीबीने त्यांच्या संघात एका धोकादायक खेळाडूला सामील केले आहे, हा खेळाडू जैकब बेथलच्या जागी संघात सामील झाला आहे.‌

आरसीबीने प्लेऑफच्या सामन्यांसाठी त्यांच्या संघात जैकबच्या जागी ( jecob bethell) नव्या खेळाडूची रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. जैकबला इंग्लंडसाठी खेळायचे असल्याने त्याने आयपीएल 2025 स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याजागी 30 वर्षांच्या सेफर्टला पहिल्यांदाच आरसीबी संघात स्थान देण्यात येणार आहे. याआधी त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईटसाठी खेळलेला आहे. सेफर्टने न्यूझीलंडसाठी 66 टी20 सामने खेळलेले आहेत.

टीम सेफर्टने आतापर्यंत खेळलेल्या 4 वनडे सामन्यात 19.66 च्या सरासरीने 59 धावा केल्या आहेत. याशिवाय 66 टी20 सामन्यात त्याने 28 च्या सरासरीने1540 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 10 अर्धशतक सुद्धा आहेत.

सेफर्टला जगातील अनेक टी20 लीग मध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याने पीएसएल इंटरनॅशनल टी-20 बिग बॅश, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि लंका प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतलेला आहे. पाकिस्तान सुपर लीग मध्ये त्याने 16 सामन्यात 408 धावा केल्या आहेत. याशिवाय कैरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने 788 धावा केल्या आहेत. या शिवाय लंका प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नावावर 631 धावा आहेत. आता तो आयपीएलमध्ये आरसीबीसाठी कशी कामगिरी करेल यावर सगळ्यांचे लक्ष असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---