आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग बंद दरवाजाआड आणि विनाप्रेक्षक पार पडेल. यावर्षी उद्घाटनाचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स व विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या दरम्यान होईल.
आयपीएलच्या इतिहासातील आत्तापर्यंतच्या उद्घाटनाच्या सामन्यांमधील आकडेवारी नेहमीच रंजक राहिली आहे. आज, त्याच आकडेवारीविषयी आपण जाऊन घेऊ.
१. मुंबई इंडियन्सने आजपर्यंत स्पर्धेचा पहिला सामना प्रत्येकी तब्बल ७ वेळा खेळला आहे. मुंबईने ७ मधील केवळ २ सामने जिंकले आहेत. यावर्षी मुंबई विक्रमी आठव्यांदा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात उतरेल.
२. आयपीएलमधील सध्या खेळत असलेल्या ८ संघातील फक्त पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्स हे संघ स्पर्धेचा पहिला सामना १४ वर्षांत कधीही खेळले नाहीत.
३.आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ ६ वेळा जिंकला आहे व ७ वेळा पराभूत झाला आहे.
४. आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने ४ वेळा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व यात संघाला २ विजय व २ पराभव पहायला लागले आहेत.
५.आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सीएसकेने ५ वेळा नाणेफेक जिंकली आहे. सलग तीन वर्ष सलग नाणेफेक जिंकण्याचा पराक्रम कोलकाता नाईट रायडर्सने (२०१३, २०१४, २०१५) साली केला आहे.
६. आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ४ वेळा परदेशी कर्णधार संघाचे नेतृत्त्व करताना दिसले. ऍडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स, २०१०), माहेला जयवर्धने (दिल्ली डेअरडेविल्स, २०१३), डेविड वॉर्नर (सनरायझर्स हैद्राबाद, २०१७), शेन वॉटसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१७)
आयपीएलच्या हंगामातील पहिला सामना
२०२१- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०२०- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
२०१९- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१८- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०१७- सनराइजर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१६- मुंबई इंडियन्स विरुद्ध राइजिंग पुणे सुपरजायंट्स
२०१५- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१४- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०१३- दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१२- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२०११- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
२०१०- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स
२००९- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२००८- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स