इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाच्या चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. नुकतेच सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अशातच आता आयपीएलच्या तारखा समोर येत आहेत. पुढच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक देखील खेळला जाणार आहे. अशात खेळाडूंना या दोन स्पर्धांमध्ये पुरेशी विश्रांती मिळेल, याचीही काळजी घेतली गेली आहे.
भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व आयपीएल फ्रँचायझींना संघ घोषित करण्याची अंतिम तारीख दिली होती. 12 डिसेंबर पर्यंत खेळाडूंची खरेदी विक्री केली जाऊ शकते, तर 19 डिसेंबर रोजी आगामी आयपीएल हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आयपीएल 2024 चे वेळापत्रक किंवा तारखा अधिकृतपणे समोर आल्या नसल्या, तरी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली गेली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार पुढच्या वर्षी 20 मार्च रोजी आयपीएल हंगामाची सुरुवात होईल. तर हंगामातील शेवटचा सामना मे महिन्यात 20 तारखेला खेळला जाऊ शकतो. आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. 3 जून रोजी पहिला विश्वचषक सामना आयोजित केला जाऊ शकतो. अशात आयपीएल आणि टी-20 विश्वचषकादरम्यान किमान 10 दिवसांचे अंतर ठेवले गेले आहे. म्हणजे सर्व खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ दिला गेला आहे.
दरम्यान, पुढच्या वर्ष आयपीएलचा 16वा हंगाम खेळला जाणार आहे. मागच्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्ज संघाने जिंकला. सीएसकेसाठी हे आयपीएलचे पाचवे विजेतेपद होते. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने देखील पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्याव्यरिकिक्त कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा आयपीएल किताब जिंकला आहे. राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी एक-एक आयपीएल हंगाम जिंकला आहे. (Read IPL 2024 Start and End Date’s)
महत्वाच्या बातम्या –
अविस्मरणीय भारत दौऱ्यानंतर मॅक्सवेल मायदेशी रवाना! जाताना म्हणाला, ‘Thank You इंडिया’
नव्या गाडीवर धोनीने खर्च केले 3.3 कोटी! आवाज आणि नंबर प्लेटचं प्रत्येकाकडून कौतुक