इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून झाली असून या लीगमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या हंगामातील ८ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) या संघामध्ये खेळला गेला. हा सामना कोलकाताने ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालला (Mayank Agarwal) सुद्धा प्रथम गोलंदाजी करायची होती. परंतु, श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने पंजाबने प्रथम फलंदाजी केली. पंजाबने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एकच सामना जिंकला आहे. त्याच वेळी केकेआरने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. संघाने पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध अपयश आले.
पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, ‘आम्हाला साहजिकच गोलंदाजी करायला आवडेल. दुसऱ्या डावात येथे स्विमिंग पूल पाहायला मिळतो.’ वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत अय्यरने केलेल्या आशा वक्तव्यामुळे बरेच लोक चकित झाले होते.
खरंतर, मुंबईत संध्याकाळी भरपूर दव असते. अशा परिस्थितीत गोलंदाजी करणे सोपे होत नाही. विशेषत: फिरकी गोलंदाजांना खूप अवघड जाते. केकेआरकडे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायणच्या रुपाने दोन दिग्गज फिरकीपटू आहेत, त्यामुळेच अय्यर असे म्हणाला.
आयपीएलच्या १५ व्या हंगामात आतापर्यंत वानखेडे स्टेडियमवर २ सामने झाले असून दोन्ही सामने संघाने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने सीएसकेचा ६ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ५ गडी राखून पराभव केला. अखेरच्या ५ षटकात संघाला ६८ धावा करायच्या होत्या. पण दव पडल्यामुळे ऑफस्पिनर दीपक हुडाने १६ व्या षटकात २२ धावा दिल्या आणि लखनऊने सामना जिंकला.
दव असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना दुसऱ्या डावात खेळणे खूप अवघड जाते. विशेषतः हळुवार चेंडू टाकताना, कारण चेंडू हातातून निसटतो. कोरोनामूळे आयपीएलच्या चालू हंगामातील साखळी फेरी फक्त महाराष्ट्रातच खेळवली जात आहे. अशा स्थितीत येथील नाणेफेक प्रत्येक सामन्यात महत्त्वाची ठरणार आहे, कारण दूसऱ्या डावात जो संघ गोलंदाजी करेल त्याला अपयश येण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल मुंबई वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
तब्बल २८ वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे ११ नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
आपल्याच जीवनावर बनवलेला चित्रपट पाहिल्यावर प्रविण तांबेला अश्रू अनावर, Video होतोय व्हायरल