काल मोनॅको येथे युसीएल २०१७/१८ चा ड्रॉ झाला आणि युएफा २०१६/१७ च्या पुरस्कारांचे पण वितरण झाले. सलग दोन वेळा युएफा जिंकलेल्या रिआल माद्रिदच्या खेळाडूंचे यात निर्विवाद वर्चस्व दिसुन आले. बेस्ट डिफेंडर सर्जिओ रॅमॉस, बेस्ट मिडफिल्डर लुका मॉड्रिक, तर बेस्ट फॉरवर्ड क्रिस्तिआनो रोनाल्डो या ३ माद्रिदच्या खेळाडूंना तर बेस्ट गोलकीपरचा पुरस्कार जिआलुंजी बुफॉन या जुवेन्टसच्या ३९ वर्षीय कर्णधार आणि खेळाडूला मिळाला. युएफा मेन्स ‘प्लेअर ऑफ दी इयर’ सुद्धा रोनाल्डो तर युएफा वूमेन्स ‘प्लेअर ऑफ दी इयर’ बार्सिलोनाच्या मार्टेन्सला मिळाला.
युसीएल २०१७/१८ च्या ड्रॉ मध्ये ४ पॉटला प्रत्येकी ८ टीम होत्या आणि त्यातून १ टीम १ ग्रुप ला असे ८ ग्रुप होते. पहिल्या पॉटला २०१५/१६ चे विजेते रिआल माद्रिद आणि टॉप ८ देशाचे टॉप संघ होते. उरलेल्या ३ पॉटच्या टीम्स या युएफा क्लब कोइफिशिएंटच्या आधारे ठरवतात. काल झालेल्या ड्रॉ मध्ये ८ ग्रुप्सला अश्या प्रकारे टीम वाटल्या गेल्या.
ग्रुप A :-
१. बेनफिका
२. मँचेस्टर युनाइटेड
३. बसेल
४. मोस्कवा
ग्रुप B :-
१. बायर्न मुनीच
२. पॅरिस सेंट जर्मन
३. आंडेरलेचट
४. सेल्टिक
ग्रुप C :-
१. चेल्सी
२. एटलेटिको डी माद्रिद
३. रोमा
४. कारबाग
ग्रुप D :-
१. जुवेन्टस
२. बार्सिलोना
३. ओलीम्पिअकोस
४. स्पोर्टींग सीपी
ग्रुप E :-
१. स्पार्टाक मॉस्कोव
२. सेव्हिला
३. लिव्हरपूल
४. मारिबोर
ग्रुप F :-
१. डोनेट्स्क
२. मँचेस्टर सिटी
३. नापोली
४. फेयेनूर्ड
ग्रुप G :-
१. मोनॅको
२. पोर्टो
३. बेसिकटास
४. लेइपझिग
ग्रुप H :-
१. रिआल माद्रिद
२. डोर्टमंड
३. टॉटेनहॅम हॉट्सपर
४. अपोइल
नचिकेत धारणकर ( टीम महा स्पोर्ट्स )