युरोपियन चॅम्पियन रियल माद्रिदला पुढच्या मोसमातील लीग सामने सुरू होण्यापूर्वीच 50 मिलीयन युरो मिळणार आहे.
युनियन ऑफ युरोप फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) नविन रेव्हेन्यु सिस्टीमनुसार पुढच्या मोसमात क्लब्सना भरपूर आर्थिक फायदा होणार आहे.
युइएफएने हे स्पष्ट केले की, 2.04 बिलीयन युरो हे जे संघ 2018-19च्या फ्लॅगशीपच्या स्पर्धेत खेळणार त्यांच्यात विभागून दिले जाणार आहेत. तसेच काहींना कदाचित जास्त रक्कम मिळू शकते.
युइएफएचे अध्यक्ष अलेक्सांद्र सेफेरिन हे 2016च्या रेव्हेन्यु सिस्टीम ही नविन योजना आलेल्या काळात निवडले गेले. सध्या युरोपियन फुटबॉल समोर स्पर्धात्मक अडचणी निर्माण झाल्या आहे. त्या काही एका रात्रीतच सोडवता येणार नाहीत. म्हणूनच त्यांनी ही सिस्टीम आणली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन लीगच्या ग्रुप स्टेजमध्ये भाग घेणाऱ्या संघाना सुरूवातीलाच भाग घेतला म्हणून फी स्वरूपात रक्कम मिळणार आहे. ही रक्कम सगळ्या संघांसाठी सारखीच असणार आहे.
जिंकलेल्या सामन्यांना पण वेगळी बक्षिस रक्कम तर आधीच्या निकालानुसार आणखी जास्त रक्कम संघांना दिली जाणार आहे. शेवटी टीव्हीचे शेयर्स पण मिळणार आहे.
ही रक्कम गुणांच्या क्रमवारीवर आधारीत आहे. हे गुण युरोपियन चॅम्पियनच्या मागील दहा मोसमानुसार दिले जाणार आहे. याचा फायदा मोठ्या क्लब्सना होणार आहे.
युइएफएने म्हटले आहे की, 585.05 मिलीयन युरोची विभागणी केली तर सगळ्या संघाना 1.108 मिलीयन युरो मिळणार आहेत. संघाना त्यांच्या क्रमवारीनुसार शेयर्स मिळणार आहे.
32 संघात ग्रुप स्टेजमधील सगळ्यात शेवटच्या स्थानावर असलेल्या संघाला एक शेयर मिळाला तर त्याला 1.108 मिलीयन युरो मिळणार. जर असेच शेयर बाकीच्या संघांच्या क्रमवारीनुसार मिळवले तर अव्वल स्थानावर असलेल्या संघाला 32 शेयर्स म्हणजेच 35.46 मिनीयन युरो भेटतील.
रियल माद्रिद हा संघ मागील तीनही मोसमाचा विजेता आहे. म्हणून ते गुणांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर बार्सिलोना, बायर्न म्युनिच, अॅटलेटिको माद्रिद, मॅंनचेस्टर युनायटेड, चेलसा, ज्युवेन्तुस, पोर्टो, अर्सेनल आणि बेनफिका या संघांचा क्रम लागतो.
या 32 संघांना सुरूवातीलाच 15.65 मिलीयन युरो मिळणार आहेत. यामुळे रियलला एकूण 51.11 मिलीयन युरो मिळणार आहेत. तसेच त्यांना शेयर मार्केटचे 292 मिलीयन युरो सुध्दा मिळणार आहेत.
जर एखाद्या संघाने सामना जिंकला तर त्यांना 2.7 मिलीयन युरो आणि अनिर्णित सामन्यास 900,000 युरो मिळणार आहेत.
16च्या फेरीत असलेल्या संघांना 9.5 मिलीयन युरो तर अंतिम फेरीत पोहचलेल्या संघाला 15 मिलीयन युरो भेटणार आहे.
तिसऱ्या पात्रता फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला 480,000 युरो आणि 1.37 मिलीयन युरो हे संघ बाकीच्या फेऱ्यामध्ये कसे खेळले त्यानुसार दिले जाणार आहे.
युइएफएच्या या नवीन रेव्हेन्यु सिस्टीमनुसार चॅम्पियन लीग, युरोप लीग आणि सुपर कप या सगळ्या स्पर्धा मिळून 3.25 बिलीयन युरो एवढी मोठी रक्कम संघांना मिळणार आहे.