2014 फिफा विश्वचषकातील ब्राझिल विरूध्द जर्मनी सामन्यामध्ये वापरलेली गोलपोस्टची नेट चॅरेटीसाठी विकली गेली. हा सामना जर्मनीने 7-1 ने जिंकला होता.
बेलो हॉरीझोन्तेमधील मिनाईराओ स्टेडियमवर हे तेच स्टेडियम आहे जेथे ब्राझिलचा जर्मनीकडून दारूण पराभव झाला होता. हा सामना 8 जुलेैला म्हणजेच चार वर्षांपूर्वी झाला होता.
ही नेट 8150 तुकड्यांमध्ये कापली गेली आहे. ह्याची ऑनलाईन विक्री 71 युरो म्हणजेच 83 डॉलरला होत आहे.
एक नेट बेलो हॉरीझोन्तेमध्येच ठेवली जाणार आहे. मात्र एका नेटला चांगलीच पसंती मिळत आहे. ती नेट 2014च्या सामन्यातील पहिल्या सत्रात जर्मनीने केलेले पाच गोल तर दुसऱ्या सत्रात ब्राझिलकडून ऑस्करने केलेला गोल यामध्ये वापरली होती.
तर बाकीच्या नेट जर्मनीतील फुटबॉल म्युझियमला दिल्या जाणार आहे.
“ती अत्यंत गंभीर घटना विसरून दुसरा अधिक चांगला विचार करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे”, असे मिनाईराओचे मुख्य अधिकारी सॅमुअल लॉयड म्हणाले.
आयोजकांना असा विश्वास आहे की, यामधून जवळपास 500,000 युरो(586,000 डॉलर) एवढी रक्कम ब्राझिलमधील चॅरीटीसाठी उपलब्ध होईल.







