भारतीय क्रिकेट संघाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानांवर टी२० आणि कसोटी मालिका खेळायच्या (Sri Lanka Tour Of India) आहेत. या मालिकांसाठी शनिवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकांसाठी रोहित शर्मा याच्याकडे संघाचे कर्णधारपद असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची उपकर्णधारपदी (Team India’s Vice-Captain) निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी यष्टीरक्षक केएल राहुल (KL Rahul) हा भारतीय संघाचा उपकर्णधार होता. परंतु तो दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध अनुपस्थित (KL Rahul Injury) असल्याकारणाने बुमराहवर ही जबाबदारी सोपवण्यात (Reason Behind Appointing Bumrah As Vice Captain)आली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांदरम्यान राहुलला दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी२० मालिकेतून बाहेर झाला होता. आता तो दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धची टी२० आणि कसोटी मालिकाही खेळू शकणार नाही.
हेही वाचा- ब्रेकिंग! वनडे, टी२० नंतर कसोटीच्याही नेतृत्त्वाचा मुकूट रोहितच्याच डोक्यावर, संघाचीही झाली घोषणा
यापूर्वी बीसीसीआयने राहुलच्या दुखापतीविषयी अधिकृत माहिती दिली होती. राहुलला ९ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डाव्या बाजूला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेला मुकला आहे. आता तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होतील. तिथे तो दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड याला टी२० संघात जागा देण्यात आली आहे, असे बीसीसीआयने सांगितले होते.
अजूनही राहुल हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा झाला नसल्याने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये निवडण्यात आलेले नाही. त्याच्याजागी बुमराहला कसोटी आणि टी२० संघाचा उपकर्णधार नियुक्त केले आहे. तर मयंक अगरवालला सलामीवीर म्हणून संघात जागा देण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, रवी बिश्नोई.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर अश्विन (फिटनेसवर अवलंबून), रविंद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार
श्रीलंकेचा भारत दौरा-
टी२० मालिका
२४ फेब्रुवारी – पहिली टी२०, लखनऊ
२६ फेब्रुवारी – दुसरी टी२०, धरमशाला
२७ फेब्रुवारी – तिसरा टी२०, धरमशाला
कसोटी मालिका
४-८ मार्च – पहिली कसोटी, मोहाली
१२-१६ मार्च – दुसरी कसोटी, बेंगळुरू (दिवस-रात्र)
महत्त्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीत आले अब्दुल समदचे वादळ! झंझावाती शतकासह मोडले अनेक विक्रम
विराटबरोबरच ‘या’ फॉर्मात असलेल्या खेळाडूला अर्ध्यातूनच विश्रांती, तिसऱ्या टी२०त असेल अनुपलब्ध
रणजीच्या रणांगणातही पुजारा फेल! मुंबईविरुद्ध फोडू शकला नाही भोपळा