वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन वनडे सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी सरशी साधली. या मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली हे संघात असतानाही दोन सामन्यांमध्ये बाकावर बसले. पहिल्या सामन्यातही त्यांनी विशेष योगदान दिले नव्हते. अशा स्थितीत त्यांना बाहेर का बसवले याबाबत खुलासा झाला आहे.
वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला होता. मात्र यामध्ये रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. तर, विराटने फलंदाजी केली नाही. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात या दोघांनी विश्रांती घेतली. भारतीय संघ हा सामना पराभूत झाला. तिसऱ्या सामन्यात हे दोघेही खेळतील अशी अपेक्षा असताना त्यांना बाहेरच ठेवण्यात आले. अशा परिस्थितीतही भारताने तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावे केली.
मात्र, विराट व रोहित यांना खेळायचे नव्हते तर त्यांचा संघामध्ये समावेश का केला गेला? असा प्रश्न अनेकांना पडलेला. त्याबाबत सांगण्यात आले की, रोहित व विराट पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. ते ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी मालिका तसेच आशिया चषक खेळणार आहेत. मात्र, भारताच्या संघातील प्रमुख फलंदाज असलेले श्रेयस अय्यर व केएल राहुल सध्या फिटनेस मिळवण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घाम गाळत आहेत. त्यांनी सरावाला सुरुवात केली असली तरी, ते कितपत तंदुरुस्त आहेत याबाबत कोणतीही कल्पना संघ व्यवस्थापनाला दिली गेली नाही.
याचमुळे या दोघांचे पर्याय शोधण्यासाठी अचानक संघ व्यवस्थापनाला आपली रणनीती बदलावी लागली. कारण, या खेळाडूंचे फिटनेस अपडेट 21 जुलै रोजी देण्यात आलेले. तर या मालिकेसाठी संघाची निवड त्याआधीच झालेली. त्यामुळे विराट व रोहित यांना बाकावर बसून संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड व सूर्यकुमार यादव यांना खेळवले गेले.
(Reason Behind Virat Kohli And Rohit Sharma Rested Against West Indies In ODI)
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचे वर्ल्डकप तिकीट कन्फर्म! ‘हे’ कारण देत दिग्गजानेच उमटविली मोहोर
“संजू विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकाचा दावेदार”, दिग्गजाने दिली पसंती