भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेत अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी मोर्चा सांभाळला होता. या ऐतिहासिक विजयात वॉशिंग्टन सुंदरने देखील महत्वाची भूमिका बजावली होती. गेल्या काही दिवसांपासून वॉशिंग्टन सुंदरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या पाळलेल्या कुत्र्यासोबत दिसून येत आहे. त्याचे नाव सुंदरने ‘गॅबा’ असे ठेवले आहे. चला तर मग जाणून घेऊ हे नाव ठेवण्यामागचे प्रमुख कारण.
वॉशिंग्टन सुंदरला या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. तसेच त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील गॅबा मैदानामधून केली होती. म्हणून त्याने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव ‘गॅबा’ असे ठेवले आहे.
सुंदरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत, नेटकऱ्यांना ‘गॅबा’ सोबत ओळख करून दिली आहे. त्याने गॅबासोबत शेअर केलेल्या फोटोवर कॅप्शन म्हणून लिहिले की, “प्रेम हा चार पायाचा शब्द आहे, भेटा गॅबाला”.
https://www.instagram.com/p/CNNXKGGlnd2/
भारतीय संघाने गॅबा येथे झालेला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत मालिका आपल्या नावावर केली होती. ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात, भारतीय संघासमोर ३२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारतीय संघाने यशस्वीरित्या पूर्ण केले होते. सूंदरने या सामन्यातील पहिल्या डावात ६२ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात रिषभ पंत सोबत मिळून त्याने ५३ धावांची महत्वाची भागीदारी केली होती. तसेच ताबडतोड २९ चेंडूत २२ धावांची खेळी करत त्याने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
द्विशतक पूर्ण नाही झाले, पण फखर जमानने सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम
देवदत्त पडीक्कलच्या अनुपस्थितीत हे ‘३’ फलंदाज आरसीबीकडून पाडू शकतात चौकार आणि षटकारांचा पाऊस
आयपीएल इतिहासात झाली आहे ‘या’ लाजिरवाण्या विक्रमांचीही नोंद; दिग्गज खेळाडूंचाही समावेश