---Advertisement---

आरसीबीने स्वतःच्या पायावर मारून घेतला धोंडा; ‘या’ चार कारणांनी संपले स्पर्धेतील आव्हान

On: मंगळवार, ऑक्टोबर 12, 2021 12:55 PM
rcb
---Advertisement---

सोमवारी (११ ऑक्टोबर) आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात केकेआरने आरसीबीचा चार विकेट्स राखून पराभव केला आणि आरसीबीला स्पर्धेतून बाहेर केले. आता केकेआर क्वॉलिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत भिडणार आहे. सोमवारी पार पडलेल्या सामन्यात आरसीबीने घेतलेले काही निर्णय त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले आहेत.

प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकला

सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, विराटने घेतलेला हा निर्णय नंतर चुकीचा ठरला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गन म्हटला की, मी आनंदी आहे, कारण मी क्षेत्ररक्षण करू इच्छित होतो. मागच्या काही सामन्यांचा विचार केला तर आरसीबीने प्रथम गोलंदाजी घेऊनच विजय मिळवला होता. अशात केकेआरविरुद्धच्या सामन्यातही प्रथम गोलंदाजी करणेच संघासाठी योग्य ठरले असते.

नरीनचे आक्रमण

केकेआरचा दिग्गज फिरकी गोलंदाज सुनील नरीनने सामन्यात उत्कृष्ट खेळ दाखवला. त्याने आरसीबीचे चार महत्वाचे बळी घेतले. यामध्ये विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि मागच्या सामन्यात सलामीवीर ठरलेल्या श्रीकर भरतचा समावेश होता. नरीनने आरसीबीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २१ धावा दिल्या आणि चार विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना १५ चेंडूंचा सामना केला आणि २६ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने मारलेल्या तीन षटकारांचाही समावेश आहे.

खराब क्षेत्ररक्षण

सामन्यात आरसीबीने श्रेत्ररक्षणातही काही महत्वाच्या संधी गमावल्या. त्यांनी क्षेत्ररक्षणावेळी केकेआरच्या फलंदाजांचे दोन निर्णायक झेल सोडले. ग्लेन मॅक्सवेलच्या नवव्या षटकात शहाबाज अहमदने वेंकटेश अय्यरचा झेल सोडला. याव्यतिरिक्त सतराव्या षटकात देवदत्त पडिक्कलने सुनील नरेनचा झेल सोडला. या दोन विकेट्स जर आरसीबीने मिळवल्या असत्या तर, सामन्याच्या शेवटी चित्र नक्कीच वेगळे दिसले असते.

फलंदाजांची हाराकिरी

याव्यतिरिकत्त पराभवाचे एक अन्य प्रमुख कारण आहे की, सलामीवीरांनी संघाला दिलेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीने पहिल्या पाच षटकांमध्ये ४९ धावं केल्या होत्या. पण त्यानंतर संघातील एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. सलामीवीर फलंदाजांना सोडले तर एकही फलंदाज २० धावांचा आकडा पार करू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---